WhatsApp वर Dark Mode फिचर नसले तरीही WhatsApp Web साठी 'या' पद्धतीने वापरता येणार
WhatsApp प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

WhatsApp वर डार्कमोड (Dark Mode) बाबतच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. तर डार्क मोड म्हणजे एक प्रकारचे ऑल ब्लॅक थीम होय. Android 10 वर्जनमध्ये डार्कमोड देण्यात आले आहे. त्याचसोबत ट्वीटर, मेसेंजर आणि सोशल मीडियावरील काही अॅपसाठी डार्क मोड युजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

युजर्स डार्क मोड WhatsApp वर कधी वापरण्यासाठी उपलब्ध होणार याची वाट पाहत आहे. टेस्टिंगदरम्यान याबाबत विचार करण्यात आला. परंतु स्मार्टफोन युजर्ससाठी WhatsApp डार्कमोड फिचर लॉन्च करण्यात आलेले नाही. तसेच स्मार्टफोन अॅपसाठी डार्क मोड आले नसले तरीही WhatsApp Web साठी डार्क मोड युजर्सला वापरता येणार आहे.

M4shd नावाच्या एका XDA मेंबरने WhatsApp Desktop साठी एक थीम तयार केली आहे. त्यासाठी Mod असून ते तुम्हाला तुमच्या कंप्युटरमध्ये इन्स्टॉल करावे लागणार आहे.

-WhatsApp च्या वेबसाइटवरुन डेस्कटॉपसाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये त्याचे वर्जन प्रथम डाऊनलोड करा.

-https://www.whatsapp.com/download/ येथून डाऊनलोड करता येणार आहे.

-Window आणि macOS या दोन्ही वर्जनसाठी डाऊनलोड करता येणार आहे. डाऊनलोड केल्यानंतर चॅट सिंक करण्यापूर्वी मोबाईलमधून QR कोड स्कॅन करावा लागणार आहे.(स्मार्टफोनसाठी Android 10 अपडेट लॉन्च, बदलणार 'हे' फिचर्स)

तर WhatsApp डेस्कटॉप सुरु केल्यानंतर WADark.exe या ऑप्शनवर क्लिक करावे. या ऑप्शनवर क्लिक केल्यास इंन्स्टॉलेशन सुरु होईल. तसेच इन्स्टॉल करुन झाल्यावर WhatsApp डेस्कटॉपवर डार्क मोड एक्टिव्हेट होणार आहे.