पॅटर्न लॉक ( फोटो सौजन्य - फेसबुक )
आपल्या मोबाईलमधील फोटो, व्हिडिओ आणि  इतर डेटा सुरक्षित राहावा यासाठी आपण मोबाईलला पॅटर्न लॉक लावतो. मात्र कधी कधी आपण तो स्वत:हून विसरुन जातो त्यामुळे मोबाईलला लावलेला पासवर्ड आठवण्यासाठी विविध पॅर्टन लॉक वापरतो. त्यामुळे मोबाईल लॉक होण्याची शक्यता असते. जर अशा वेळी तुमचा मोबाईल लॉक झाला असेल तर अनलॉक करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा.
-मोबाईलचे लॉक काढण्यासाठी ज्यांच्याकडे अँड्रॉईड फोनमध्ये  अँड्रॉईड  डिवाईस नावाच्या सॉफ्टेर असेल तर ते लॉक काढता येते. तसेच गुगल अकाऊंटवरुन लॉगिन केल्यानंतर इरेज या ऑप्शनवर जाऊन क्लिक केल्यावर फोन रिसेट होतो. परंतु लॉक जरी उघडता आले तरीही मोबाईलमधील सर्व डेटा निघून जातो.
- जर तुम्ही अँड्रॉई़ड 4.4  किंवा त्यापूर्वीचे व्हर्जन वापरत असल्यास त्यामध्ये 5 वेळा चुकीचा पासवर्ड टाकावा लागतो. त्यानंतर Forgot Pin, Forgot Pattern किंवा Forgot Password हे ऑप्शन दिसतील. यावर क्लिक करुन त्यामध्ये गुगल ई-मेल आयडीने लॉगिन करावे. तसेच रिसेट पासवर्डचा ऑप्शन येईल. या पद्धतीचा उपयोग केल्यास मोबाईलमधील डेटासुद्धा सुरक्षित राहू शकतो.
-जर कोणत्याच ट्रिक उपयोगी येत नसतील तर 'फॅक्ट्री रिसेट' या ऑप्शनचा वापर करावा. यासाठी मोबाईलचे पावर आणि आवाजाचे बटण एकत्रित दाबून धरल्यास मोबाईल रिकव्हरी मोडवर येईल. त्यानंतर येणारे ऑप्शन वापरुन मोबाईलचे अनलॉक करु शकता.
-तुमच्या मोबाईलमध्ये जर गुगल असिस्ट किंवा व्हॉईस रेकॉर्ड केल असेल तर 'अनलॉक द व्हॉईस' या ऑप्शनच्या सहाय्याने 'ओके गुगल' बोलून तुमच्या मोबाईलचे पॅर्टनलॉक अनॉक करु शकता.