प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

तुमची मोबाईल स्क्रीन सारखी सारखी हँग होते का? तुमचा फोन तुमची टच कमांड रिड करत नाही का? तुम्हालाही या समस्या असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मोबाईलची स्क्रीन हँग झाल्यावर युजर्स इरिटेड होतात आणि सर्व्हीस सेंटरला भेट देतात. पण अनेकदा स्क्रीनचा काही प्रॉब्लेम नसतो. सेटिंग्स आणि इतर अनेक गोष्टींमुळे या समस्या उद्भवतात. तर मोबाईल स्क्रीन लॉक होण्याची समस्या दूर करण्यासाठी सोप्या ट्रिक्स...

अॅप्स करा डिलीट

अनेकदा आपण फोनमध्ये विनाकारण अॅप्स डाऊनलोड करतो ज्यामुळे आपला फोन हॅंग होऊ लागतो. या अॅप्समध्ये बग किंवा व्हायरस असतात. त्यामुळे मोबाईलमध्ये काही फंक्शन्स काम करणे बंद करतात. जर तुम्हाला फोनमध्ये देखील हा प्रॉब्लेम येत असेल तर फोनमधील वापरत नसलेले अॅप्स डिलीट करा किंवा अँटी-व्हायरसचा वापर करुन मोबाईलमधील व्हायरस क्लिन करा.

स्क्रिन गार्ड बदला

अनेकदा स्क्रीन गार्डमुळे मोबाईल स्क्रीन तुमचा टच रिड करु शकत नाही. याचे मोठे कारण म्हणजे फोनवर लावलेल्या स्क्रीन गार्डची क्वालिटी खराब असेल. याशिवाय स्क्रीन गार्ड जास्त जुना झाला असेल तर स्क्रीन तुमची टच कमांड रिड करु शकत नाही. त्यामुळे चांगल्या क्वालिटीचा स्क्रीन गार्डचा वापर करा.

रीस्टार्ट

मोबाईल हँग होत असेल तर सर्वप्रथम तो रीस्टार्ट करा. कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट सुरळीत करण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे. मोबाईल हँग झाल्यास किंवा काम करत नसल्यास फोन लगेचच री स्टार्ट करा.

स्क्रीन कोरड्या कपड्याने साफ करा

अनेकदा स्क्रीनला पाणी किंवा तेलाचे हात लागतात. त्यामुळे मोबाईलची स्क्रीन हँग होते. अशावेळी फोनची स्क्रीन एका स्वच्छ आणि कोरड्या कपड्याने साफ करा. स्क्रीन साफ करताना फोन किंवा स्क्रीन ऑफ ठेवा. स्क्रीन साफ केल्यानंतर ९० सेकंदाने फोन ऑन करा. यामुळे मोबाईल पूर्वीप्रमाणे काम करेल.

फॅक्ट्री रिसेट

फोनची स्क्रीन हँग होत असेल तर Factory Reset चा पर्याय तुमच्याकडे आहे. Factory Reset मुळे तुमचा फोन डिफॉल्ड सेटिंग्समध्ये येतो. सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे- तुमचा फोन नव्यासारखा होतो. फोन रिकव्हर करण्यासाठी तुम्हाला Power Off बटणासोबत वॉल्यूम वाढवण्याचे बटण दाबावे लागेल. त्यानंतर अॅनरॉईडचा पर्याय आल्यावर पावर बटण सोडून द्या. वॉल्यूम बटणाच्या साहाय्याने Factory Reset ऑप्शन सिलेक्ट करा आणि पावर बटण प्रेस करा.