
आजकाल व्हॉट्सअॅपशिवाय मेसेज पाठवण्याचा विचार करणं जवळपास अशक्य झालं आहे. व्हॉट्सअॅपवर केवळ मेसेज पाठवणं इतकंच फीचर नसून आजकाल अनेकांचे बिझनेसही केवळ व्हॉट्सअॅपवर चालतात. दिवसेंदिवस व्हॉट्सअॅप युजर्सचं प्रमाण वाढत चाललं आहे. भारतातच 20 कोटीहून अधिक लोकं नियमित व्हॉट्सअॅप वापरतात. दिवसागणिक त्याची फीचर्स वाढत आहेत. मग आज अशीही एक ट्रीक पहा ज्यामुळे तुम्हांला समोरच्या व्यक्तीचा फोन नंबर सेव्ह न करताही मेसेज पाठवता येऊ शकतो.
नंबर सेव्ह न करता कसा पाठवाल मेसेज ?
- मोबाईलमध्ये इंटरनेट कनेक्ट असल्याची खात्री करून घ्या. त्यानंतर ब्राऊझरच्या अॅड्रेस बारमध्ये api.WhatsApp.com/send?phone=number ही लिंक ओपन करा.
- आता नंबर ज्या ठिकाणी आहे तेथे भारताचा कोड 91 आणि त्यापुढे समोरच्या व्यक्तीचा ( ज्या व्यक्तीला मेसेज करायचा आहे ) मोबाईल क्रमांक एन्टर करा.
- उदा: api.WhatsApp.com/send?phone=919999999999
- यानंतर मेसेजसाठी बटण येईल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही थेट व्हॉट्स अॅप चॅटवर जाल. यामुळे तुम्ही नंबर सेव्ह न करता झटपट मेसेज शेअर करू शकता. नक्की वाचा : व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक झाल्यावर नेमके काय कराल ?