WhatsApp | ( Photo Credits: Pixabay.com)

ChatGPT बाबत सध्या खूपच चर्चा रंगत आहे. या स्मार्ट एआय चाटबोट (Smart AI Chatbot) ने गूगल (Google) आणि मायक्रोसॉफ्ट (Microsoft) मधील स्पर्धा अजूनच वरच्या स्तरावर नेऊन ठेवली आहे. ChatGPT जवळ पास सार्‍याच प्रश्नांची उत्तरं देते. एखादी कविता लिहण्यापासून अगदी कोडं सोडवण्यापर्यंत ते तुमच्यासाठी कोड्स लिहून देण्यापर्यंत सारी मदत करते. पण तुम्हांला ठाऊक आहे का? ChatGPT तुमच्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप मेसेजला आता उत्तरही देऊ शकणार आहे.

जगभरात व्हॉट्सअ‍ॅप हे लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे जगाच्या एका टोकावरून दुसर्‍या टोकावर असलेल्या व्यक्तीसोबत रोजचा संवाद साधण्यासाठी कोट्यावधी लोकं त्याचा वापर करतात. पण अनेकदा असंही होतं की आपल्याला सार्‍याच मेसेजेसला उत्तर देण्यासाठी वेळ नसतो. पण आता तुमची व्हॉटसअ‍ॅपला मेसेजसाठी वेळ नसल्याची तक्रार ChatGPT दूर करु शकणार आहे. थेट ChatGPT व्हॉट्सअ‍ॅप सोबत लिंक करता येऊ शकत नसला तरीही थर्ड पार्टी अ‍ॅपच्या मदतीने नक्कीच हे इंटिग्रेशन केलं जाऊ शकतं. नक्की वाचा: Microsoft ने चॅटजीपीटी मेकर ओपनएआयमध्ये $10 बिलियनची केली गुंतवणूक .

व्हॉट्सअ‍ॅप आणि चॅटजीपीटीची सांगड कशी घालाल?

युजर्स ChatGPT हे WhatsApp मध्ये इंटिग्रेट करण्यासाठी GitHub ची मदत घेऊ शकतात. डेव्हलपरने पायथन स्क्रिप्ट तयार केली आहे त्याच्या द्वारा ChatGPT हे WhatsApp मध्ये इंटिग्रेट होऊ शकतं. यासाठी लॅग्वेज लायब्ररी वापरता येऊ शकते. त्यासाठी https://github.com/danielgross/whatsapp-gpt.इथे भेट द्या.

“download zip” वर क्लिक करा.

“Whatsapp-gpt-main” फाईल ओपन करा.

टर्मिनल वर “server.py” ला एक्झिक्युट करा.

“ls” ला हिट करून एंटर करा.

“python server.py” एंटर करा.

आता तुमचा फोन थेट OpenAI chat page सोबत काम करण्यासाठी सज्ज झाला आहे.

“Verify I am a human” च्या बॉक्सवर क्लिक करा.

आता WhatsApp account वर जाऊन OpenAI ChatGPT शोधा.

ChatGPT तुमच्या WhatsApp मध्ये इंटिग्रेटेड झाले आहे की नाही हे तपासण्यासाठी, तुम्ही बॉटला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करू शकता.