आजकाल फेसबुकवरील फेक प्रोफाईलचे प्रस्थ वाढले आहे. त्यातून अनेकांची फसवणूकही होत आहे. तर मग हे फेक प्रोफाईल नेमके ओळखायचे तरी कसे? जाणून घेऊया...
प्रोफाईल फोटो
कोणतेही फेसबुक अकाऊंट फेक आहे की नाही, याची माहिती तुम्ही प्रोफाईल फोटो पाहून लावू शकता. प्रोफाईलवर किती आणि कसे फोटोज अपलोड केले आहेत, यावरुन पोफ्राईलचा अंदाज लावता येईल. तसंच फोटोत कोणाकोणाला टॅग केलं आहे त्याची सिक्युरिटी कशी आहे, यावरुन अंदाज लावता येईल.
नाव
फेक फेसबुक प्रोफाईल ओळखण्याची सर्वात मोठी पद्धत म्हणजे फेसबुक अकाऊंटवरील नाव. फेक फेसबुक प्रोफाईलवर तुम्हाला कॉमन किंवा विचित्र नावे पाहायला मिळतील.
टाईमलाईन
फेसबुक प्रोफाईल बनवल्यावर तुम्ही तुमच्यासंबंधितच्या अनेक गोष्टी फेसबुकवर टाकल्या असतील. असेच तुमच्या फ्रेंड्सनेही केले असेल. फेक आयडी वरुन तुम्हाला प्रोफाईलची माहिती मिळत नाही. ती माहिती इतकी बनावट असते की तुम्ही ते अगदी सहज ओळखू शकता. त्याचबरोबर व्यक्तीच्या वर्क प्रोफाईलवरुन तुम्ही फेक आयडी ओळखू शकता.
अॅक्टीव्हिटी
अधिकतर फेक अकाऊंट्स हे मुलींच्या नावाने असतात. या प्रोफाईलच्या टाईमलाईनवर सेलिब्रेटी, देव-देवता किंवा मुलींचे फोटोज पाहायला मिळतात. यात भडक गोष्टी अधिक दिसतील.
कमेंट्स आणि मेसेज
फेक आयडी ओळखण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्या आयडीवरील फोटो किंवा पोस्टवर लिहिलेले कमेंट्स. फेक आयडीवरील पोस्टवर हैराण करणाऱ्या कमेंट्स पाहायला मिळतात.
मोबाईल नंबर
मुलीच्या फेसबुक आयडीवर जर तुम्हाला मोबाईल नंबर दिसत असेल तर ते प्रोफाईल फेक आहे हे ओळखावे. कोणत्याही युजर्सला वाटत नाही की, त्याचा नंबर सार्वजनिक असावा. विशेष करुन मुली तर मोबाईल नंबर आयडीवर शेअर करत नाहीत. अशावेळी नंबरच्या मदतीने युजर्सला फसवण्याचा प्लॅन असू शकतो.