Threads from Instagram: निवडक लोकांसोबत फोटो, स्टेट्स शेअर करण्यासाठी इंस्टाग्राम युजर्ससाठी नवं अ‍ॅप
Secret Instagram hashtags used to sharing hidden x-rated content. (Photo Courtesy: Pexels)

इंस्टाग्राम युजर्ससाठी आता अजून एक खूषखबर आहे. नुकतेच इंस्टाग्रामने Threads from Instagram हे नवं अ‍ॅप लॉन्च केले आहे. तुमच्या जवळच्या मित्रांसोबत कनेक्टेड राहण्यासाठी आणि केवळ ठराविक कोलांसोबतच तुमच्या आयुष्यातील काही खास गोष्टी शेअर करण्यासाठी हे अ‍ॅप सुरू करण्यात आलं आहे. याच्या माध्यमातून तुम्हांला फोटोज, व्हिडिओ, मेसेज, स्टोरिज तुमच्या क्लोज फ्रेंड्स सोबत शेअर करता येणार आहे.

इंस्टाग्रामने वर्षभरापूर्वी क्लोज फ्रेंड फीचर लॉन्च केले होते. याद्वारा काही निवडक लोकांसोबत तुम्ही गोष्टी शेअर करू शकाल. आता थ्रेड्स अ‍ॅपमध्ये तुम्हांला चॅतिंगसाठी खास इन्बॉक्स असेल, केवळ विशिष्ट लोकांकडून तुम्हांला नोटिफिकेशन मिळू शकतात.

थ्रेडसमध्ये क्लोज फ्रेंड्सचा पर्याय असेल, ज्याच्याद्वारा कॅमेरा ओपन केल्यानंतर तुम्हांला थेट विशिष्ट लोकांना फोटो पाठवण्याची सोय आहे. विशिष्ट लोकांसाठी खास स्टेटस अपडेट करण्याची सोय देखील यामध्ये देण्यात आली आहे. इन्स्टाग्रामचे हे अ‍ॅप सध्या iOS आणि Android दोन्हीमध्ये उपलब्ध आहे.