How to Download Hotstar & Watch SRH vs KKR IPL 2021 Match 3: सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल सामना पाहण्यासाठी हॉटस्टार कसं डाउनलोड कराल? जाणून घ्या
सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: File Image)

How to Watch SRH vs KKR IPL 2021 Match 3: चेन्नईच्या (Chennai) एम.ए, चिदंबरम स्टेडियमवर आज माजी आयपीएल विजेते सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात तिसरा सामना रंगणार आहे. इयन मॉर्गनकडे पहिल्यांदा कर्णधारपदाची पूर्ण जबाबदारी असणार आहे. मागील वर्षी युएई येथे झालेल्या आयपीएलमध्ये (IPL) संघाच्या खराब कामगिरीनंतर मॉर्गनकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. दुसरीकडे, गेल्या हंगामात आयपीएलमध्ये फक्त चार सामनेलेल्या ज्येष्ठ वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या पुनरागमनाने हैदराबादच्या गोलंदाजीला अधिक धार मिळणार आहे. दरम्यान, आयपीएल भारतात परतले असले तरी यंदाही चाहत्यांना घरी बसल्याच सामन्यांचा आनंद घ्यावा लागणार आहे. अशास्थितीत लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंगसाठी Disney+ Hotstar हा प्रेक्षकांसाठी एक उत्तम पर्याय आहे. (IPL 2021 Points Table Updated: पॉइंट्सटेबलमध्ये दिल्लीने गाठलं ‘शिखर’, CSK vs DC सामन्यानंतर पहा गुणतालिकेची स्थिती)

Disney+ Hotstar यंदा देखील आयपीएलचे स्ट्रीमिंग पार्टनर असून येत सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स संघातील आयपीएलचा तिसरा सामना लाईव्ह प्रसारित करतील. आजचा सामना पाहण्यासाठी आपण आपल्या स्मार्टफोनवर Diseny+ Hotstar डाउनलोड करू शकता. दरम्यान, दोन्ही संघातील आजचा आयपीएलचा सामना लाइव्ह पाहण्यासाठी Android यूजर्ससाठी हॉटस्टार गुगल स्टोअरवर उपलब्ध असेल, तर Apple मोबाईल यूजर्ससाठी अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. Disney+Hotstar डाउनलोड करण्यासाठी आपल्याला या सोप्प्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.

1. हॉटस्टार डाउनलोड करणे खूप सोपे आहे. आपल्या प्ले स्टोअर वर जा आणि हॉटस्टार शोधा.

2. मग इन्स्टॉल पर्यायवर जाऊन क्लिक करा आणि आपल्या फोनमध्ये अ‍ॅप इन्स्टॉल करा.

3. आता, आपल्या अ‍ॅप्लिकेशन मेनूमध्ये किंवा होम स्क्रीनवर आपल्याला एक हॉटस्टार अ‍ॅपचे चिन्ह दिसेल.

4. आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटने साइन इन करुन अ‍ॅप उघडू शकता किंवा आवश्यक तपशील प्रदान करून साइन अप करू शकता.

5. आता आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा स्पर्धा जसे की आयपीएल, टीव्ही शो, चित्रपट आणि बरेच काही पाहू शकता.

हॉटस्टार अ‍ॅपद्वारे आपण आजचा सामना लाइव्ह आपल्या मोबाईलवर पाहू शकता. आपण आपल्या फोनवर सहजपणे हा अ‍ॅप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. आयपीएलचे सामने यंदा हॉटस्टार हिंदी, इंग्रजी, बंगाली, तमिळ, पंजाबी आणि मराठी अशा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.