Google Drive मधून डिलिट झालेल्या Files 'या' पद्धतीने करा रिकव्हर, जाणून घ्या अधिक
Google Drive (Photo Credits-Twitter)

सध्या आपली महत्वाची कागदपत्रांची आपण सॉफ्टी कॉपी तयार करुन ती गुगल ड्राइव्हवर स्टोर करतात. कारण ही क्लाउड सेवा अत्यंत सुरक्षित आहे. यामध्ये फाइल लीक होण्याची शक्यता फार कमी आहे. परंतु बहुतांश वेळा असे होते की, आपण अजाणपणे फाइल स्टोर करतेवेळी चुकीचे बटण दाबतो आणि त्यामुळे फाइल डिलिट होते. जर तुमच्यासोबत सुद्धा असे झाले असेल तर त्रस्त होऊ नका. कारण आम्ही तुम्हाला एक खास ट्रिक बद्दल सांगणार आहोत. त्याच्या मदतीने तुम्ही डिलिट झालेल्या फाइल अत्यंत सहज रिस्टोर करत येणार आहेत.

गुगल ड्राइव्हच्या माध्यमातून डिलिट झालेल्या फाइल रिकव्हर करण्यासाठी काही सोप्प्या स्टेप्स फॉलो करा. तर जाणून घ्या याबद्दल अधिक.(WhatsApp Tips And Tricks: व्हॉट्सअॅपवर तुम्हाला ब्लॉक केलं असेल तर, अशा प्रकारे करा स्वतःला अनब्लॉक; जाणून घ्या 'या' सोप्या ट्रिक)

-डिलिट फाइल रिस्टोर करण्यासाठी सर्वाधिक प्रथम गुगल ड्राइव्ह अॅप सुरु करा

-आता Trash ऑप्शनवर क्लिक करा

-येथे तुम्हाला फाइल मिळेल ज्या डिलिट झाल्या आहेत

-यामध्ये तुम्हाला ज्या फाइल रिस्टोर करायचा आहेत त्या निवडा

-त्यानंतर डिलिट फाइल रिस्टोर होतील

-गुगल ड्राइव्हच्या माध्यमातून डिलिट झालेल्या फाइल ट्रॅश फोल्डरमध्ये फक्त 30 दिवसपर्यंत असतात.

-युजरला 30 दिवसांच्या आतमध्ये फाइल रिकव्हर करु शकतात. परंतु युजरने असे न केल्यास त्या फाइल 30 दिवसानंतर स्वत: हून डिलिट होतील.

गुगल ड्राइव्हचे मुख्य फिचर असे आहे की. Convert Documents. याच्या माध्यमातून युजरला महत्वाची कागदपत्र सॉफ्ट कॉपी PDF ला Docs मध्ये बदलता येणार आहे. तसेच गुगल ड्राइव्हमध्ये सर्च फिल्टरचा सपोर्ट दिला गेला आहे. याच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही फाइल फॉर्मेट, ऑनर आणि डेटनुसार सर्च करता येणार आहे. या सहज पद्धतीने गुगल ड्राइव्हच्या माध्यमतून डिलिट झालेल्या फाइल सहज रिकव्हर करता येणार आहेत. यामध्ये तुम्ही तुमचा डेटा सुद्धा मिळवू शकता.