Google Pay: 'गुगल पे' बंद करण्याचा कंपनीचा निर्णय, वाचा काय आहे कारण?
Google Pay (Photo Credits: Twitter)

रोजच्या आयुष्यात सध्या यूपीआयच्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने पैशांचे व्यवहार करणे आणखी सोपे झाले आहे. ऑनलाईन पेमेंट क्षेत्रात रोज नवनवे बदल होत असतात. सध्या ऑनलाईन पेमें प्लॅटफॉर्म गुगल पेने मोठा निर्णय घेतला आहे. सध्या गुगल पे हे अ‍ॅप एका देशात बंद करण्यात आले आहे. अमेरिकेत 4 जून 2024 पासून गुगल पे हे अ‍ॅप बंद करण्यात आले आहे. हा निर्णय नेमका का घेण्यात आला? याबाबत नेमके आणि ठोस कारण समोर आलेले नाही. गुगल पे हे अ‍ॅप ऑनलाईन व्यवहारांसाठी सुरक्षित मानले जाते. भारताने वापराच्या बाबतीत हे अ‍ॅप दुसऱ्या क्रमांकावर आहे. (हेही वाचा - Online Shopping: माहितीचा ओव्हरलोड आणि जाहिरातींच्या भडिमारामुळे 88% भारतीयांची ऑनलाइन खरेदीला नापसंती; अहवालातून सत्य समोर)

अमेरिकेत गुगलकडून गुगल वॉलेटला प्रमोट केलं जातंय. तसेच ऑनलाईन पेमेंट आणखी सोपे व्हावे यासाठी गुगलकडून प्रयत्न केले जात आहेत. याच कारणामुळे अमेरिकेत गुगल पे बंद करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकेत गुगल पे वापरणाऱ्यांना थेट गुगल वॉलेट वापरायला चालू करावे लागणार आहे. कंपनीने याआधी सांगितल्यानुसार भविष्यात 180 देशांत गुगल पेच्या ऐवजी गुगल वॉलेट हेच चालू ठेवले जाणार आहे. या देशांत गुगल वॉलेट बंद केले जाणार आहे.

भारतात मात्र गुगल पे हे अ‍ॅप बंद होणार नाही. ते भारतात जसे आहे, तसेच चालू राहील. भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. हे अ‍ॅप वापरून आर्थिक व्यवहार करणाऱ्यांचे भारतात मोठे प्रमाण आहे. हे ग्राहक हातातून जाऊ नयेत म्हणून गुगल पे या अ‍ॅपची सुविधा भारतात चालूच राहील. दुसरीकडे अमेरिकेत गुगल पेच्या तुलनेत गुगल वॉलेट वापरणाऱ्यांचे प्रमाण हे पाच पट अधिक आहे.