Children’s Day 2018 Google Doodle : बालदिन विशेष गूगल डुडलद्वारा साकारलं चिमुकल्याचं असिमीत भावविश्व
बालदिन विशेष गूगल डुडल photo google

आज 14 नोव्हेंबर हा भारतामध्ये बालदिन म्हणून साजरा केला जातो. गूगलनेही या बालदिनाचं औचित्य साधून खास गुगल डूडल सादर केल आहे. बालदिन विशेष या गुगल डूडलच्या माध्यमातून चिमुकल्यांसमोर अंतरिक्ष काय आहे? हे दाखवण्यात आलं आहे.लहान मुलांच्या मनात असलेल्या संशोधक प्रवृत्तीवर यामधून प्रकाश टाकण्यात आला आहे. एक मुलगी टेलिस्कोपच्या मदतीने आकाशातील ग्रह, तारे न्याहाळत असलेल्या चिमुकलीला प्रातिनिधिक स्वरूपात दाखवण्यात आलं आहे.

मुंबईच्या जे.बी. वाच्छा शाळेच्या एका विद्यार्थिनीने   हे खास गुग़ल डूडल बनवले आहे.

पिंगला राहुल मोरे  या 7 वर्षीय मुलाने हे गूगल डुडल बनवले आहे. ‘डूडल 4 गूगल’ही स्पर्धा गूगलतर्फे आयोजित केली जाते. यंदा 'लहान मुलांना काय प्रेरित करते?' या थीमवर डुडल बनवायचे होते. देशभरातून सुमारे75,000 मुलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.

पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यांना लहान मुलांबाबत विशेष प्रेम होते. त्याचा आदर राखत भारतामध्ये नेहरूंच्या जन्मदिवशी भारतामध्ये बालदिन साजरा केला जातो.