Flipkart Women's Day Sale 2019: जागतिक महिला दिनानिमित्त फ्लिपकार्टवर 'या' स्मार्टफोनवर मिळणार भरघोस सूट
Flipkart Women's Day Sale 2019 (Photo Credits-Twitter)

Flipkart Women's Day Sale 2019: 'फ्लिपकार्ड वुमन्स डे सेल'ला सुरुवात झाली आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप, टीव्ही आणि अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर भरघोस सूट देण्यात आली आहे. या सेलमध्ये फ्लिपकार्टने एचडीएफसी बँकसोबत हात मिळवणी केली आहे. त्यामुळे युजर्सला लो-कॉस्ट ईएमआय मिळणार आहे. कंपनीने एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड ग्राहकांना सुद्धा ही ऑफर देत आहे.

फ्लिपकार्टच्या या ऑफर सेलमध्ये असुस, सॅमसंग, शाओमी, अॅपल आणि अन्य कंपनीच्या स्मार्टफोनवर भरघोस सूट मिळणार असल्याची ऑफर दिली आहे. दरम्यान फ्लिपकार्ट फ्लॅशसेलचे ही आयोजन करणार आहे. तर पाहूयात कोणत्या स्मार्टफोनवर किती सूट देण्यात आली आहे.

असुस जेनफोन 5 जेड या स्मार्टफोनवर कंपनी 3000 रुपयांची सूट देत आहे. तर जेनफोन लाईट एल1 वर कंपनी 1000 रुपयांची ग्राहकांना सूट देत आहे. त्याचसोबत असुस जेनफोन मॅक्स एम1 या स्मार्टफोनवर 500 रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. तसेच नो कॉस्ट ईएमआयची सुविधा सुद्धा या स्मार्टफोनसाठी देण्यात आली आहे.

ऑफर्समध्ये असुस जेनफोन 5 जेड स्मार्टफोनसाठी 5GB RAM आणि 64GB स्टोरेज असणाऱ्या वेरियंटची किंमत 21,999 रुपये आहे. तर 6GB RAM आणि 128GB स्टोरेज असणाऱ्या वेरियंटची किंमत 24,999 रुपये आहे. जेनफोन लाईट एल1 हा स्मार्टफोन तुम्ही फ्लिपकार्टच्या या ऑफरमध्ये 4,999 रुपयांना खरेदी करु शकणार आहात. तसेच जेनफोन मॅक्स प्रोसाठी 7,999 रुपये किंमत ठेवण्यात आली आहे.