फ्लिपकार्ट फ्लिपस्टार्ट डेज सेल (Flipkart’s Flipstart Days Sale) उद्यापासून सुरु होत आहे. 1 ते 3 डिसेंबर या कालावधीत हा सेल सुरु राहणार असून यात इलेक्ट्रिक अॅक्सेसरीजवर (Electronic Accessories) 80 टक्के डिस्काऊंट मिळत आहे. टीव्ही (TV), एसी (AC) आणि फ्रिजवर (Fridge) 50 टक्कांपर्यंत डिस्काऊंट मिळत आहे. हा सेल सर्व कॅटेगरीत उपलब्ध असून कपडे, शूज, ब्युटी प्रॉडक्टस, फर्निचर आणि इतर कॅटेगरीत देखील वेगवेगळे डिस्काऊंट मिळत आहेत.
फ्लिपकार्टने आपल्या वेबसाईटच्या मेन पेजवर या सेलची जाहीरात लावली असून काही ऑफर्स सुद्धा दाखवल्या आहेत. फ्लिपकार्टच्या फ्लिप डे सेल मध्ये वेगवेगळ्या ब्रँडच्या हेडफोन्स आणि स्पीकर्सवर 70 टक्कांपर्यंतचा डिस्काऊंट मिळत आहे. त्याचप्रमाणे बेस्ट सेलिंग लॅपटॉप्सवर 30 टक्कांची सूट मिळत आहे. स्मार्ट वॉचेस आणि फिटनेस बँड 1299 रुपयांपासून खरेदी करु शकता. या सेल मध्ये वस्तू खरेदी करताना तुम्ही नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर आणि एक्सडेंडेट वॉरंटी चा लाभ देखील घेऊ शकता. या सेलमध्ये 8999 रुपयांपासून तुम्ही स्मार्ट टीव्ही विकत घेऊ शकता.
युजर्स ज्या वस्तू खरेदी करु शकतात त्या वस्तू विश लिस्टमध्ये टाकण्यासाठी फ्लिपकार्टने पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. या फिचरचा वापर करुन सेल दरम्यान तुम्ही तुमच्या विश लिस्टमधल्या सर्व वस्तू अगदी सोप्या पद्धतीने आणि लवकरच ऑर्डर करु शकता. जर तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल तर या सेल अंतर्गत तुम्ही ऑफिस चेअर्स आणि लॅपटॉप टेबल्स चांगल्या डिस्काऊंटमध्ये विकत घेऊ शकता.
फ्लिपकार्टच्या फ्लिपस्टार्ट डेज सेल मध्ये अगदी 129 रुपयांपासून मोबाईल अॅक्सेसरीज विकत घेता येतील. काही प्रसिद्ध ब्रँडच्या फ्रीज आणि टीव्ही वर 40 टक्कांपर्यंत सूट मिळत आहे. फ्लिपकार्टचा फ्लिपस्टार्ट डेज सेल लाईव्ह झाल्यानंतर अजून काही आकर्षक ऑफर्सची घोषणा करण्यात येईल.