फ्लिपकार्टने सुुरु केला 'फेस्टीव धमाका सेल' ; 'या' वस्तूंवर मिळणार भरगोस सूट
फ्लिपकार्ट (File Photo)

सध्या ऑनलाईन शॉपिंगचा जमाना आहे. ऑनलाईन शॉपिंगमुळे बाहेर पडून शॉपिंग करण्याचा वेळ वाचतो. घरबसल्या तुम्ही हवी ती शॉपिंग करु शकता. त्याचबरोबर कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या आकर्षक ऑफर्समुळे पैशांचीही बचत होते. त्यामुळे अनेकजण ऑनलाईन शॉपिंग करण्यास पसंती देतात. दिवाळीनिमित्त फ्लिपकार्टने सेल जाहीर केला आहे. पाहुया त्यात मिळणाऱ्या काही ऑफर्स...

कधी सुरु होणार ऑफर्स?

दिवाळी काही दिवसांवर असताना फ्लिपकार्ट कंपनीने खास सेल जाहीर केला आहे. 24 ते 27 ऑक्टोबर या दरम्यान हा सेल असून याचे नाव 'फेस्टीव धमाका सेल' असे ठेवण्यात आले आहे. या सेलमध्ये ग्राहकांना जवळपास 100 हून अधिक उत्पादनांवर सूट मिळणार आहे. त्यामुळे दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी ही जबरदस्त संधी आहे. फ्लिपकार्ट प्लस मेंबर्संना या संधीचा इतर ग्राहकांपेक्षा आधी लाभ घेता येईल. या ग्राहकांसाठी 23 ऑक्टोबरला हा सेल सुरु होईल. तर इतर ग्राहक 24 ऑक्टोबरपासून ऑफर्सचा लाभ घेऊ शकतील. यंदा फ्लिपकार्टने अॅक्सिस बँकेशी हातमिळवणी केली असून त्यावरून व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना डिस्काऊंट देण्यात येणार आहे.

या वस्तूंवर मिळणार डिस्काऊंट

या सेलमध्ये तुम्ही मोबाईल, एलईडी टीव्ही, लॅपटॉप आणि इतर वस्तूंवर सूट मिळणार आहे. यावरील ऑफर्स दर 8 तासांनी रिफ्रेश करण्यात येतील.

या आहेत ऑफर्स

# Oppo F9 हा 4 जीबी रॅम आणि 64 जीबी मेमरीच्या फोनवर 3 हजार रुपयांचे डिस्काऊंट मिळत असून तो तुम्हाला फक्त 18,990 रुपयांना मिळेल.

# Vivo V9 4 जीबी रॅम आणि 64 जीबी मेमरीच्या फोनवर 8 हजारांचे डिस्काऊंट दिल्याने हा फोन तुम्हाला 15,990 रुपयांना उपलब्ध होईल. त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला एक्सचेंज ऑफर्स, बायबॅक गॅरंटी यांसारख्या सुविधाही मिळतील.

# तसंच इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 80% पर्यंत डिस्काऊंट मिळेल. कॅनन, सोनी, निकॉन यांसारख्या कंपन्यांच्या DSLR कॅमेऱ्यांवर 15 हजाराचे डिस्काऊंट देण्यात येणार आहे.

# विविध ब्रँडचे स्पिकर आणि हेडफोन्सवर 75% चा डिस्काऊंट मिळेल. त्याचबरोबर Intel Core i 3 हा लॅपटॉप 27,490 रुपयांऐवजी 21,990 रुपयांना मिळेल.

# सॅमसंगचा 32 इंचाचा एचडी टीव्ही 15,999 रुपयांना उपलब्ध होईल. तसंच या ऑफर्सअंतर्गत इतर अनेक गोष्टींवर डिस्काऊंट मिळणार आहे.