Flipkart Big Saving Days Sale ला 13 जून पासून प्रारंभ; स्मार्टफोन, लॅपटॉप सह अन्य इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईसेसवर मिळणार बंपर सूट
Flipkart Big Saving Days Sale (Photo Credits: Flipkart Official Site)

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल (Flipkart Big Saving Days Sale) रविवार 13 जून पासून सुरु होत आहे. यात स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेसवर जबरदस्त डिस्काऊंट मिळत आहे. हा सेल 16 जून पर्यंत सुरु राहणार असून सीएसबीआय कार्ड (SBI Card) असलेल्या ग्राहाकंना 10 टक्के इंस्टंट डिस्काऊंट मिळणार आहे. 12 जूनच्या मध्य रात्रीपासून फ्लिपकार्ड प्लस मेंबर्सं (Flipkart Plus Members) साठी हा सेल खुला होईल आणि इतर सर्वांना 13 जून पासून सेलचा लाभ घेता येईल.

फ्लिपकार्डच्या या सेलमध्ये स्मार्टफोन हे मुख्य आकर्षण असणार आहे. या सेलमध्ये Google Pixel 4a, iPhone 11 Pro, Motorola Razr 5G, Samsung Galaxy F12 आणि Asus ROG Phone 3 या स्मार्टफोन्सवर डिस्काऊंट मिळेल. या सेलअंतर्गत 46,999 रुपये किंमत असलेला Asus ROG Phone 3 डिस्काऊंटमध्ये 31,999 रुपयांना मिळेल. Samsung Galaxy F12 या स्मार्टफोनवर 1000 रुपयांचा डिस्काऊंट मिळत असून हा फोन तुम्हाला 9999 रुपयांना उपलब्ध होईल. (Amazon Mobile Savings Days Sale 2021 अंतर्गत Realme X7, Oppo F19 Pro+ 5G सह OnePlus च्या स्मार्टफोनवर मिळणार जबरदस्त डिस्काऊंट; जाणून घ्या ऑफर्स)

Google Pixel 4a या स्मार्टफोनवर 3000 रुपयांचा डिस्काऊंट मिळत असून हा फोन तुम्ही 26,999 रुपयांना खरेदी करु शकता.  iQoo 3 हा 34,990 रुपयांचा फोन तुम्हाला 24,990 रुपयांना मिळेल. मोटोरोला रेझर 5जी या स्मार्टफोनवर 20,000 रुपयांचा डिस्काऊंट मिळत असून सेलअंतर्गत तुम्ही हा फोन 89,999 रुपयांना खरेदी करु शकता.

फ्लिपकार्ट सेल मध्ये आयफोन 11 प्रो वर 5000 रुपयांचा डिस्काऊंट मिळत असून हा फोन 74,999 रुपयांना विकत घेऊ शकाल. तर आयफोन एक्स आर या फोनवर 2000 रुपयांचा डिस्काऊंट मिळत असून हा 39,999 रुपयांना उपलब्ध होईल. Gionee Max Pro, Infinix Smart 5 आणि  Micromax in Note 1 या स्मार्टफोन्सवर आकर्षक डिस्काऊंट मिळेल.

त्याचबरोबर फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेस आणि अॅक्सेसरीजवर 80 टक्के डिस्काऊंट मिळेल. स्मार्टवॉचेसवर 60 टक्के डिस्काऊंट तर टॅबलेटवर 50 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळेल. डेस्कटॉप, पीसी आणि लॅपटॉप्सवर 30 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येईल. तसंच टीव्हीवर 70 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळेल.

विशेष म्हणजे या सेलमध्ये काही ठराविक वेळेत ‘Crazy Deals' सादर केल्या जातील. 12, 8 आणि दुपारी 4 वाजता ठराविक वेळेसाठी निवडक ऑफर्स असतील. यात एसबीआयच्या कार्डवरुन खरेदी केल्यास इन्टंट डिस्काऊंट, EMI या सुविधा मिळतील.