सोशल मिडिया पूर्ववत झाले असले तरी इन्स्टाग्राम च्या युजर्सला अजूनही येतायत हॅशटॅग मध्ये अडचणी
Social Media (Photo Credits: File Image)

सध्या फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (Whatsapp) आणि इंस्टाग्राम (Instagram) हे आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनले आहे. सोशल मिडिया म्हटलं की आपल्या स्मार्टफोनमध्ये सकाळी उठल्या उठल्या जे अॅप उघडले जातात ते म्हणजे फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम. या सोशल मिडियाच्या माध्यमातून संपूर्ण जग खूप जवळ आले आहे. मात्र बुधवारी दुपारपासून या सगळ्यांचा वेग मंदावला आहे. त्यामुळे नेटक-यांना फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप वापरताना ब-याच अडचणी येत होत्या. आता जरी या सोशल मिडियाची सेवा सुरु झाली असली तरी त्यांचा वेग अजूनही संथच आहे. म्हणूनच या सगळ्याबाबत फेसबुकने दिलगिरी व्यक्त केली आहे.

आमच्या लाखो युजर्सना जो त्रास झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत आणि आम्ही लवकरच आमची सेवा पूर्ववत करु , असे दिलगिरीचे पोस्ट फेसबुकने केले आहे.

सोशल मिडिया पूर्ववत झाल्याचे फेसबुक कडून सांगण्यात आले असले तरीही अजूनही इन्स्टाग्राम च्या यूजर्सना हॅशटॅग मध्ये अडचणी येत आहेत. याबाबत अनेक इन्स्टा यूजर्स ट्विट करत आहेत.

बुधवारी अनेक लोकांना मग ते व्यवसाय किंवा नोकरी क्षेत्रातले असोत किंवा इतर क्षेत्रातले त्यांना फेसबुकचा वेग मंदावलेला जाणवत होता. ते जेव्हा इमेजेस किंवा व्हिडिओ पाठवत होते त्यावेळी हा वेग मंदावला होता. मोबाईलवरच्या फेसबुक अॅपला अडचणी येत होत्या.

हेही वाचा - Facebook Dating app: फेसबुकवर देखील सुरु होणार डेटिंग, सिक्रेट क्रशला द्या प्रेमाची कबुली

फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप च्या या संथ वेगाचा परिणाम व्यवसाय, नोकरी क्षेत्रातील लोकांवर झाला आहे. मात्र आता फेसबुकने ही समस्या सोडविली असली तरीही वेग पुर्ववत होण्यास थोडा वेळ लागेल.