Facebook Messenger Update: लवकरच मेसेंजर वरही १० मिनिटांच्या आत चुकीचा मेसेज डिलीट करण्याची सोय मिळणार ?
फेसबुक (संग्रहित प्रतिमा)

व्हॉट्स ऍप प्रमाणे आता फेसबुकवरही चुकून पाठवलेला मेसेज डिलीट करण्याची सोय मिळणार आहे. युजर्स गेल्या अनेक दिवसापासून फेसबुक मेसेंजर वर हा पर्याय मिळावा याकरिता मागणी करत होते. अखेर एका ट्विटर युजरने दिलेल्या माहिती नुसार मेसेंजर लवकरच हे फीचर युजर्ससाठी आणणार आहे. सुरुवातीला हे फिचर आय ओ एस म्हणजेच ऍपल फोन वापरणाऱ्यांना मिळणार आहे.

नव्या ऍप अपडेट नुसार सुरुवातीला १० मिनिटांच्या आत तुम्ही फेसबुक मेसेंजर वर चुकुवून पाठवलेला तुमचा मेसेज डिलीट करू शकता. हि सुविधा version 191.0 of Messenger's iOS client साठी उपलब्ध होणार आहे. फेसबुक कडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे कधी हे अपडेट जाहीर केलं जाईल या बाबतही कोणतीच माहिती नाही. मात्र लवकरच फेसबुकने हे फिचर लॉन्च करावं ही  अनेक युजर्सची इच्छा आहे.

 

अनेकदा घाईत चुकीच्या विंडोमध्ये किंवा चुकीचा मेसेज फॉरवर्ड केला जातो. मात्र जर फेसबुक मेसेंजर ने हे अपडेट आणलं तर व्हॉट्सअप प्रमाणे फेसबुकवरही युजर्सना १० मिनिटांच्या आत मेसेज डिलिट करण्याची सोय मिळणार आहे.