Redmi Note 3, Redmi Note 3 Pro: फोनच्या Screen Replacementची एकदम सोपी पद्धत
(Archived, edited, symbolic images)

स्मार्टफोन हाताळताना तो पडणे, त्याची स्क्रीन तुटणे किंवा खराब होणे हे आता सर्वसामान्य झाले आहे. आपल्यापैकी अनेकांच्या फोनची स्क्रीन अनेकदा तुटली असेल. फोनची स्क्रीन खराब झाल्यानंतर ती बदलण्यासाठी बराच खर्च होतो. अशा वेळी बरीच मंडळी खर्चाकडे पाहून फोनची स्क्रीन बदलण्याकडे दुर्लक्ष करतात. पण, हिच स्क्रीन घरच्या घरीच बदलता आली तर...? म्हणूनच आज आम्ही आपल्याला सांगत आहोत Redmi Note 3 आणि Redmi Note 3 Proची स्क्रीन घरच्या घरी बदलण्याची खास पद्धत.

Redmi Note 3, Redmi Note 3 Pro फोनची Screen Replacement करण्याची पद्धत

  • मोबईलच्या सिम ट्रे मधून सिमाकार्ड बाहेर काढा. एखाद्या प्लॅस्टिकच्या टोकदार वस्तूच्या मदतीने फोनच्या खालील भाग खोलण्यास सुरु करा.
  • मोबाईल खोलताना ध्यानात घ्या की, मोबाईलला कोणताही धक्का लागणार नाही.
  • हळूवारपणे मोबाईलचे कव्हर काढा. कव्हर आणि मेन पीसीबीसोबत एक केबल कनेक्ट असल्याचे आपल्याला दिसेन. ती काळजीपूर्वक बाजूला करुन पॅनल बाजूला करा.
  • पीसीबीवरही काही वायर असल्याचे तुम्हाला पहायला मिळेल. त्याही बाजूला करा.
  • त्यांतर पुढच्या बाजूला थोडासा दाब देत खराब झालेली स्क्रिन बाहेर काढा.
  • खराब स्क्रीन बाजूला केल्यावर आता तुम्ही त्या ठिकाणी नवी स्क्रीन लावू शकता.

ही पद्धत काहीशी गुंतागुंतीची असली तरी, काळजीपूर्वक केल्यास फारशी अवघड नाही. अगदीच तुम्हाला प्रात्याक्षिक जरी पाहायचे असलेल तर तुम्ही YouTubeची मदत घेऊ शकता. युट्यूबवर दिलेल्या माहितीनुसार तुम्ही टप्प्या टप्प्याने मोबाईल स्क्रीन बदलू शकता. सावधगिरी बाळगा की, मोबाईल स्क्रिन बदलताना मोबाईलला धक्का लागणार नाही. अन्यथा काही पैसे वाचविण्याच्या नादात तुमचा फोन कायमचा खराब होऊ शकतो.