DTH यूजर्ससाठी खुशखबर! 2 महिने फ्रिमध्ये पाहता येणार TV; 'या' वापरकर्त्यांसाठी आहे खास ऑफर
Image used for representational purpose | (Photo Credits: Twitter)

डीटीएच यूजर्ससाठी एक चांगली बातमी आहे. देशातील सर्वात मोठी डीटीएच कंपनी टाटा स्काय (Tata Sky) वापरकर्त्यांसाठी 2 महिन्यांची विनामूल्य सेवा प्रदान करणार आहे. वापरकर्त्यांना कॅशबॅक म्हणून विनामूल्य सेवा लाभ देण्यात येत आहे. टाटा स्कायकडून मिळणारी ही विनामूल्य सेवा आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank) वापरकर्त्यांसाठी आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी वापरकर्त्यांना आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे रिचार्ज करावे लागणार आहे.

या ऑफर अंतर्गत डीटीएच कंपनी टाटा स्काई 12 महिन्यांचे सब्सक्रिप्शन करणाऱ्या वापरकर्त्यांना 2 महिन्यांचा कॅशबॅक ऑफर करीत आहे. त्याचवेळी, 6 महिन्यांसाठी रिचार्ज केल्यानंतर, वापरकर्त्यांना कॅशबॅकच्या स्वरूपात एक महिन्यांच्या रिचार्जची रक्कम परत मिळणार आहे. टाटा स्कायची ही ऑफर 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत वैध आहे. ही ऑफर केवळ कंपनीच्या वेबसाइट आणि मोबाइल अॅपद्वारे केलेल्या रिचार्जसाठी वैध असणार आहे. कंपनीने सांगितले आहे की, कॅशबॅकची रक्कम सात दिवसांच्या आत वापरकर्त्यांच्या खात्यात जमा होईल. दोन महिन्यांच्या कॅशबॅक योजनेचे पुनर्भरण केल्यावर पहिल्या महिन्याची कॅशबॅक रक्कम 48 तासांच्या आत आणि दुसर्‍या महिन्यातील कॅशबॅक सात दिवसांत उपलब्ध होईल. (हेही वाचा - Amazon Great Indian Festival Sale: अॅमेझॉन सेलमध्ये लॅपटॉवर मिळेल 35 हजार रुपयांपर्यंत सूट; जाणून घ्या इतर ब्रँडवरील खास ऑफरविषयी)

विशेष म्हणजे, ही ऑफर टाटा स्काई खाते सक्रिय केल्याच्या दिवशी केलेल्या रिचार्जसाठी उपलब्ध नाही. टाटा स्काईची अशीच एक योजना बँक ऑफ बडोदाच्या क्रेडिट कार्डवरदेखील देण्यात येत आहे. बँक ऑफ बडोदा कार्डवर ही ऑफर 30 नोव्हेंबरपर्यंत वैध असणार आहे. या ऑफरशी संबंधित अधिक माहितीसाठी आपण कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊ शकता आणि या ऑफर्सचा लाभ घेऊ शकता.