Dhanteras 2020 Offers: दिवाळी सेलमध्ये iPhone SE, Poco C3, Galaxy M51 आणि OnePlus 8 Series सह या स्मार्टफोनवर मिळत आहे भरगोस सूट
Dhanteras 2020 Offers & Discounts on Smartphones ( Photo Credits; Apple, Samsung & OnePlus)

धनतेरस (Dhanteras) निमित्त नव्या वस्तूंची खरेदी केली जाते. यंदा धनतेरस निमित्त वनप्लस (Oneplus), अॅपल (Apple), पोको (Poco), सॅमसंग (Samsung) आणि इतर काही स्मार्टफोन कंपन्यांन्या फोन्सवर भरगोस सूट देत आहेत. जर तुम्ही नवा स्मार्टफोन विकत घेण्याच्या विचारात असाल तर अॅमेझॉन इंडिया (Amazon India) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) वरील हे बेस्ट डिल्स तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. (सणासुदीच्या काळात ऑनलाईन खरेदी, व्यवहार करताना Bank Frauds चा धोका; या 6 बॅंकिंग आर्थिक फसवणूकीच्या मार्गांबाबत दक्ष रहा!)

Oneplus8 Series:

वनप्लस 8 सिरीजमध्ये वनप्लस 8 आणि वनप्लस 8 प्रो या हँडसेटचा समावेश केला आहे. यंदाच्या धनतेरस निमित्त वनप्लस 8 सिरीज मधील स्मार्टफोन खरेदी केल्यास 5000 रुपयांची सूट आणि 6 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय देण्यात आला आहे. वनप्लस 8 हा स्मार्टफोन Amazon.in वर 39,999 रुपयांना उपलब्ध आहे.

वनप्लस 8 स्मार्टफोनमध्ये 6.55 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले, 48MP चा ट्रिपर रिअर कॅमेरा सिस्टम देण्यात आला असून अॅनरॉईड 10 वर आधारित OxygenOS या ऑपरेटिंग स्टिटमवर काम करतो.

OnePlus 8 & OnePlus 8 Pro (Photo Credits: OnePlus India)

Apple iPhone SE 2020:

iPhone SE 2020 हा फोन फ्लिपकार्टवर 32,999 रुपयांना उपलब्ध आहे. याच्या 64GB वेरिएंटची मूळ किंमत 39,999 रुपये इतकी आहे. यासोबतच यावर इतर अनेक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. कोटक महिंद्रा बँकेतून पेमेंट केल्यास 10% डिस्काऊंट, आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवरुन पेमेंट केल्यास 10% डिस्काऊंट आणि एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.

या फोनमध्ये 4.7 इंचाचा रेटिना डिस्प्ले, 12MP चा रिअर स्नॅपर दिला असून हा मोबाईल अॅपलच्या A13 Bionic chip वर चालतो.

Apple iPhone SE 2020 Available in India (Photo Credits: Apple India)

Poco C3:

Poco C3 च्या 3GB & 32GB वेरिएंट 7,499 रुपयांना फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवर 10% डिस्काऊंट मिळत आहे. त्याचबरोबर आयसीआयसीआय बॅंकेचे क्रेडिट कार्ड वापरल्यास 250 रुपयांपर्यंत 5% एक्स्ट्रा डिस्काऊंट दिला जात आहे. 625 रुपये प्रती महिन्यापासून नो-कॉस्ट ईएमआयच्या ऑफर्स सुरु होत आहेत. त्याचसोबत एक्सजेंच ऑफर्स देखील उपलब्ध आहेत.

Poco C3 मध्ये 6.53 इंचाचा एचडी+ डिस्प्ले, 13MP चा ट्रिपल रिअर कॅमेरा दोन वेरिएंटसह उपलब्ध आहे- 3GB + 32GB आणि 4GB + 64GB. हा स्मार्टफोन अॅनरॉईड 10 च्या MIUI 12 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्यरत आहे.

Poco C3 Smartphone (Photo Credits: Poco India)

Samsung Galaxy M51:

Samsung Galaxy M51 या स्मार्टफोनचा 6GB+12GB वेरिएंट 22,499 रुपयांना उपलब्ध आहे. तर 8GB+128GB चे वेरिएंट Amazon.in वर 24,999 रुपयांना उपलब्ध आहे. मोबाईल एक्सचेंज केल्ायस 11200 रुपयांची सूट मिळेल. एसबीआय क्रेडिट कार्डवर 3000 रुपयांचे डिस्काऊंट मिळेल.

या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला असून 64MP चा रिअर कॅमेरा आहे. 32MP चा फ्रंट लेन्स देण्यात आली आहे. त्याचबरोबर Qualcomm Snapdragon 730G chipset प्रोसेसर देण्यात आला असून हा फोन अॅनरॉईड 10 One UI Core 2.1 या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.

Samsung Galaxy M51 (Photo Credits: Samsung India)

याशिवाय  Realme C15, Oppo F15, Oppo A9, Motorola One Fusion+, Vivo V20 यांसारख्या स्मार्टफोन्सवर देखील धमाकेदार ऑफर्स मिळत आहेत.