Chandrayaan-3 | (Photo Credits: Twitter )

Chandrayaan-3: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर आता विक्रम लँडर (Vikram Lander) ने इस्रोला (ISRO) माहिती पाठवण्यास सुरुवात केली आहे. लँडर विक्रमला चंद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानाची माहिती मिळाली आहे. चंद्र पृष्ठभाग थर्मोफिजिकल प्रयोग (ChaSTE) ने अहवाल दिला की चंद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात आणि खोलीत लक्षणीय फरक आहे. इस्रोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर माहिती शेअर केली आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने रविवारी चंद्रयान-3 च्या विक्रम लँडरशी जोडलेल्या ‘चेस्ट’ उपकरणाद्वारे चंद्राच्या पृष्ठभागावरील तापमानातील फरकाचा आलेख प्रसिद्ध केला. इस्रोने जारी केलेल्या आलेखामध्ये असे आढळून आले आहे की, चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वेगवेगळ्या वेळी बदलत आहे. (हेही वाचा - Chandrayaan-3: 'शिवशक्ती पॉइंट'जवळ रहस्यांच्या शोधात फिरत आहे Pragyan Rover; ISRO ने शेअर केला व्हिडिओ, Watch)

आलेखानुसार, पेलोडने येथे आठ सेंटीमीटर खोलीवर -10 अंश तापमान नोंदवले. दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे 50 डिग्री सेल्सियस आहे. ISRO ने माहिती दिली की, विक्रम लँडरवरील पेलोडची पहिली निरीक्षणे येथे आहेत. पेलोडमध्ये तापमान मोजण्याचे यंत्र आहे. जे पृष्ठभागाच्या खाली 10 सेमी खोलीपर्यंत पोहोचण्यास सक्षम आहे. यात 10 तापमान सेन्सर आहेत. PRL अहमदाबादच्या सहकार्याने स्पेस फिजिक्स लॅबोरेटरी (SPL), VSSC च्या नेतृत्वाखालील टीमने डिझाइन केले आहे.