Byjus Layoff Again: Byju's ने आणखी 1,000-1,200 कर्मचार्यांना कामावरून काढून टाकले आहे, वाढती महागाई आणि संभाव्य आर्थिक मंदी लक्षात घेऊन वाढीव खर्च-बचत करण्यासाठी कंपनी व्यवस्थापन कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. कंपनी इंजिनीअरिंग, सेल्स, लॉजिस्टिक्स, मार्केटिंग आणि कम्युनिकेशन्स टीममधील लोकांना काढून टाकले आहे, कामावरून कपात करण्यात आलेल्या लोकांनी ही माहिती दिली आहे. अभियांत्रिकी टिममधून सुमारे 300 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे, तर लॉजिस्टिक टिममधून ऑक्टोबरमध्ये 50 टक्के कर्मचारी काढून टाकण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. बायजू लॉजिस्टिक्सचे आउटसोर्सिंग करत आहे आणि त्यामुळे कंपनीने आपल्या इन-हाऊस लॉजिस्टिक टीममधून 50 टक्के कर्मचारी काढून टाकले आहे.
पाहा पोस्ट,
Byju’s has laid off another 1,000-1,200 employees in the latest cost-cutting.
Read more about it 👇https://t.co/cpEYYdg4tO
by @Unibrowverse, @patwardhannn, @hrprya | #Byjus #Layoff
— Moneycontrol (@moneycontrolcom) February 2, 2023
Byju चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) Byju रवींद्रन यांनी अनेक अंतर्गत ईमेलद्वारे कर्मचाऱ्यांना आश्वस्त केले होते की, कंपनीने ऑक्टोबरमध्ये 5 टक्के कर्मचारी किंवा सुमारे 2,500 कर्मचाऱ्यांची कपात केल्यामुळे कोणालाही कामावरून काढले जाणार नाही. ऑक्टोबरमध्ये कर्मचार्यांना दिलेल्या ईमेलमध्ये, रवींद्रन म्हणाले, "बायजू कामावरून काढून टाकलेल्या कर्मचार्यांची पुन्हा कामावर रुजू करण्यास प्राधान्य देईल." कोणत्याही कर्मचार्यांना मेलवर कामावरून कमी केल्याबद्दल सांगितले गेले नाही, कारण ईमेल लीक होतात, असे सूत्रांनी सांगितले. बायजूने व्हॉट्सअॅप कॉलवर कर्मचाऱ्यांना गुगल मीटच्या कॉलमध्ये सामील होण्यास सांगितले आणि त्यांना कर्मचारी कपात केल्याबद्दल माहिती दिली, असे सूत्रांनी सांगितले.