हेडफोन्स आणि स्पीकर्स साठी प्रसिद्ध असलेली कंपनी बोट ने लाँच केले जबरदस्त boAt Storm स्मार्टवॉच, 'या' दिवशी होणार फ्लिपकार्टवर विक्री
boAt Storm Smartwatch (Photo Credits: Twitter)

भारतीय बाजारात जबरदस्त हेडफोन्स आणि स्पीकर्स आल्यामुळे लोकांना आपली संगीताची आवड चांगली जोपासता येत आहे. असे जबरदस्त हेडफोन्स आणि स्पीकर्स देणारी कंपनी boAt ने आता जबरदस्त फिचर्ससह नवीन स्मार्टवॉच बाजारात आणला आहे. boAt Storm असे या स्मार्टवॉचचे (SmartWatch) नाव असून यात जबरदस्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. या स्मार्टवॉचची किंमत 1,999 रुपये आहे. सध्या ही किंमत ठेवण्यात आली असून त्यानंतर कदाचित या किंमतीत वाढ होऊ शकते. या स्मार्टवॉच येत्या 29 ऑक्टोबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार असून ऑनलाईन साइट फ्लिपकार्टवर (Flipkart) याचा सेल होणार आहे.

येत्या 28 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर boAt Storm स्मार्टवॉचची विक्री सुरु होईल. त्यामुळे तुम्हाला जर हे स्मार्टवॉच घ्यायचे असेल तर ही आयती आलेली संधी अजिबात दवडू नका.

हेदेखील वाचा- Bolo Indya शॉर्ट व्हिडिओ मेकिंग प्लॅटफॉर्मने लॉन्च केले Bolo Meets, एकाच वेळी 10 लोकांसोबत करता येणार व्हिडिओ कॉल

या स्मार्टवॉचमध्ये 1.3 इंचाचा कलरफुल टच डिस्प्ले देण्यात आला आहे. यात SPO2 चा मॉनिटर देण्यात आला आहे. त्याशिवाय 24 तासांचा हार्ट रेट मॉनिटरिंग आणि गायडेज मिडिएटिव ब्रीदिंग मोड देण्यात आले आहे.

या स्मार्टवॉचच्या बॅटरी बॅकअप बद्दल बोलायचे झाले तर याची बॅटरी 10 दिवसांपर्यंत चालू शकते आणि 30 दिवसांपर्यंत याचा स्टँडबाय टाइम देण्यात आला आहे.

हे स्मार्टवॉच काळ्या आणि निळ्या अशा दोन रंगात उपलब्ध आहे. यात सिलिकॉन स्ट्रॅप काढता सुद्धा येते. स्मार्टवॉच 5ATM रेटिंगसह येतो. यात 50 मीटरपर्यंत वॉटर रेसिस्टंट देण्यात आले आहे. यात रनिंग, वॉकिंग, सायकलिंग, ट्रेडमिल आणि योगासह 9 स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. यात म्यूजिक आणि कॉल नियंत्रणात आणण्याचा देखील पर्याय उपलब्ध आहे.