नोकिया प्रेमींसाठी खुशखबर! Nokia 5.3 आणि Nokia C3 स्मार्टफोन्सवर Amazon वर मिळतेय जबरदस्त सूट, खरेदी करण्यासाठी आज शेवटची संधी
Nokia C3 And Nokia 5.3 (Photo Credits: Twitter)

स्मार्टफोन कंपनी नोकिया (Nokia) ही खूप जुनी आणि तितकीच भारतीयांच्या पसंतीस उरलेली कंपनी आहे. या कंपनीचे स्मार्टफोन्स आजही तितकेच लोकप्रिय आहेत. गेल्या काही काळापासून चीनी स्मार्टफोनचा सुळसुळाट सुरु झाल्यानंतर आता पुन्हा ही कंपनी फ्रंट फूटवर येत आहे. या कंपनीचे अनेक जबरदस्त स्मार्टफोन्स बाजारात आले आहेत. यातील Nokia 5.3 आणि Nokia C3 या स्मार्टफोन्सवर सध्या अॅमेजॉनवर (Amazon) जबरदस्त सूट मिळत आहे. यातील Nokia 5.3 च्या 4GB वेरियंटची किंमत 12,499 रुपये असून 6GB वेरियंटची किंमत 13,999 रुपये आहे.

याचाच अर्थ Nokia 5.3 वर जवळपास 4300 पर्यंतची सूट मिळत आहे. या स्मार्टफोनच्या डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर यात 6.55 इंचाची एचडी+ डिस्प्ले देण्यात आली आहे. त्याचसोबत यात स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 13MP प्रायमरी, 2MP चा डेप्थ, 5MP चा अल्ट्रा वाइड आणि 2MP चा मेक्रो सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी 8MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. Nokia 2 V Tella डुअल रियर कॅमेरा सेटअपसह झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत

यात 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. त्यासोबतच 4GB, 6GB सह 64GB चे इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे.

तर दुसरीकडे Nokia C3 हा स्मार्टफोन तुम्हाला अॅमेजॉनवर 7498 रुपयात मिळत आहे. या स्मार्टफोनमध्ये 5.99 इंचाची एचडी+स्क्रीन देण्यात आली आहे. यात 2GB आणि 3GB रॅमचे पर्याय देण्यात आले आहेत. यात 16GB चे इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे जे मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने वाढवूही शकता. यात 8MP चा प्रायमरी कॅमेरा, 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा अॅनड्रॉईड 10 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.

त्याचबरोबर अॅमेजॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरु आहे. जो साधारण महिनाभर सुरु राहणार आहे. या सेल मध्ये दरदिवसा वेगवेगळ्या ऑफर्स ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे लोकांना घरबसल्या शॉपिंगदरम्यान जबरदस्त सूट मिळत आहे.