Flipkart Big Saving Days सेलमध्ये Poco च्या 'या' स्मार्टफोनवर मिळतील आकर्षक ऑफर्स; जाणून घ्या
Flipkart Big Saving Days (PC - Flipkart)

Flipkart Big Saving Days: ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टने नुकतीच बिग सेव्हिंग डेज (Flipkart Big Saving Days) सेलची घोषणा केली आहे. हा सेल 20 जानेवारीपासून सुरू होणार असून तो 24 जानेवारीला संपेल. या सेल अंतर्गत, वापरकर्त्यांना कमी किंमतीत आणि ऑफर्ससह अनेक लोकप्रिय स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तथापि, फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनची सवलत अद्याप समोर आलेली नाही. मात्र, पोकोने आपल्या स्मार्टफोनवर झालेल्या डिल्सची माहिती शेअर केली आहे.

पोकोने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कंपनीने फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये उपलब्ध ऑफर्स संदर्भात माहिती दिली आहे. या सेल अंतर्गत वापरकर्ते अत्यंत कमी किंमतीत कंपनीचे विविध स्मार्टफोन खरेदी करू शकतात. यात Poco C3 ते Poco X3 सारख्या स्मार्टफोनचा समावेश आहे. फ्लिपकार्ट प्लस वापरकर्त्यांसाठी ही विक्री एक दिवस अगोदर म्हणजेच 19 जानेवारीच्या रात्रीपासून सुरू होईल. (वाचा - Oppo Reno 5 Pro 5G: ओप्पो कंपनीचा 'हा' धमाकेदार स्मार्टफोन उद्या भारतात होणार लॉन्च)

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये स्मार्टफोन खरेदीवर यूजर्सला त्वरित एक हजार रुपयांची सूट मिळू शकते. ही सूट एचडीएफसी कार्डधारकांना ईएमआय पर्यायावर उपलब्ध असेल. पोको स्मार्टफोनवरील ऑफर्सबद्दल सांगायचं झालं तर, ग्राहकांना पोको सी 3 स्मार्टफोनचे 3 जीबी + 32 जीबी स्टोरेज मॉडेल 6,999 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी असेल. तर 4 जीबी + 64 जीबी स्टोरेज मॉडेल 7,999 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. या स्मार्टफोनचा उपयोग नो कोस्ट ईएमआय वापरकर्त्यांद्वारे देखील केला जाऊ शकतो.

याशिवाय Poco M2 स्मार्टफोनचे 6 जीबी + 64 जीबी स्टोरेज मॉडेल 9,999 रुपयांमध्ये या सेलमध्ये उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन नो कोस्ट ईएमआय पर्यायासह देखील खरेदी केला जाऊ शकतो. Poco M2 Pro बद्दल बोलायचे झालं तर हा स्मार्टफोन 11,999 रुपयांच्या किंमतीसह उपलब्ध असेल आणि ग्राहकांना यावर 1,000 रुपयांच्या बँक ऑफरचा लाभही घेता येईल. त्याचबरोबर तुम्हाला Poco X3 खरेदी करायचा असेल तर हा स्मार्टफोन केवळ 14,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तसेच एचडीएफसी बँक कार्डचा वापर करुन तुम्हाला यावर केवळ 1000 रुपये त्वरित सूट मिळू शकते.