अॅपल (Apple) कंपनीने आयफोनच्या (iPhone) निर्मितीबाबत (Manufacture) नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. तरी अॅपलच्या या निर्णयाने भारतीयांना मोठा फायदा होणार असल्याची चर्चा आहे. कारण अॅपल कंपनी आता भारतात (India) आयफोन बनवणार (iPhone Manufacture) आहे. त्यामुळे आयफोनच्या आयातीचा (iPhone Import) खर्च कमी होणार असुन भारतात आता अगदी परवडणाऱ्या दरात आयफोन खरेदी करणं सहज शक्य होणार आहे. तरी अॅपल कंपनीने (Apple) नुकतीचं या बाबतची घोषणा केली आहे. आयफोनचं (iPhone) उत्पादन चेन्नईमधील (Chennai) स्थित फॉक्सकॉनकडून (Foxcon) करण्यात येणार आहे. फॉक्सकॉन Apple कंपनीचा भारतातील पार्टनर आहे. चेन्नईमधील प्लांटमध्ये आयफोन iPhone 14 चं उत्पादन सुरु करण्यात येणार आहे.
भारतात मोबाईल वापरकर्त्यांची (Indian Mobile User) संख्या मोठी आहे. त्यातही आयफोनचं क्रेझ (iPhone Craze) भारी. ऑनलाईल शॉपिंगच्या (Online Shopping) माध्यमातून भारतीयांनी गेल्या काही महिन्यात मोठ्या संख्येने आयफोन खरेदी केल्याची माहिती अॅपल (Apple) कंपनी कडून देण्यात आली आहे. तरी अॅपलचा हा निर्णन अॅपल (Apple) कंपनीसाठी मोठ्या फायद्याचा ठरणार आहे. तसेच भारतीयांना देखील आयात कर (Import Tax) लागू होणार नसल्यानं आयफोन कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. (हे ही वाचा:- 5G Mobile Phones: भारतात 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ; आजच खरेदी करा बजेट फ्रेंडली 5G मोबाईल)
अॅपल कंपनीकडून नुकत्याच लॉंच (Launch) करण्यात आलेला आयफोन 14 (iPhone 14) चं उत्पादन (iPhone 14 Manufacture) भारतात केल्या जाणार आहे. तर भारतात उत्पादित केलेले फोन फक्त भारतातचं नाही तर विदेशातही विकल्या जाणार आहे. म्हणजे भारताला या उत्पादनातून फायदाचं (Profit) होणार आहे. अलिकडच्या काळातच Apple कंपनीने त्यांचे चीनमधील (China) उत्पादन प्लांट बंद केले होते. त्यानंतर Apple कंपनीने भारतात iPhone 14 चं उत्पादन करण्याचा निर्णय घेतला. तरी आंतरराष्ट्रीय (International) व्यापाराच्या दृष्टीने ही एक मोठी आणि महत्वाची बाब आहे.