iPhone 12 सिरीजसाठी Apple MagSafe Battery Pack भारतात लॉन्च; जाणून घ्या खासियत आणि किंमत
Apple MagSafe Battery Pack (Photo Credits: Apple)

टेक जाएंट अॅपलने (Apple) आयफोन 12 सिरीजसाठी (iPhone 12 Series) मेगसेफ बॅटरी पॅक (MagSafe Battery Pack) लॉन्च केला आहे. याद्वारे आयफोनचे लेटेस्ट स्मार्टफोन्स वायरलेस पद्धतीने चार्ज करणे शक्य होणार आहे. हा मेगसेफ बॅटरी पॅक चुंबकासारखा आयफोन 12 मॉडल्सच्या मागे चिकटतो आणि यात आयफोन 12 च्या सर्व मॉडल्सना चार्ज करण्याची क्षमता आहे. अॅपल मेगसेफ बॅटरी पॅकची भारतातील किंमत 10,990 असून युएसमध्ये याची किंमत 99 डॉलर इतकी आहे. सध्या हा बॅटरीपॅक युएसमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असून भारतातील अॅपल स्टोअरने त्यांच्या वेबसाईटवर डिव्हाईस दाखवली आहे.

या नव्या मेगसेफ बॅटरी पॅकमध्ये मॅनेट्स असून ते आयफोन 12 च्या मॉडल्सना फीट होतील याप्रमाणे डिझाईन केले आहेत. यात आयफोन 12 मीनी, आयफोन 12, आयफोन 12 प्रो आणि आयफोन 12 प्रो मॅक्स यांचा समावेश आहे. हे एकदा आयफोनला अॅटॅच केल्यानंतर युजरला बटण दाबण्याची गरज नाही. त्याचबरोबर युजर्स मेगसेफ बॅटरी पॅक लायटनिंग केबलसोबत प्लॅग इन करु शकतात. (आनंदाची बातमी! लवकरच बाजारात दाखल होणार iPhone कंपनीचा बजेट स्मार्टफोन; किती असेल किंमत? घ्या जाणून)

Apple MagSafe Battery Pack (Photo Credits: Apple)

आयफोन 12 मॉडल्ससाठी हा बॅटरी पॅक हे 5W पावरचे देण्यास सक्षम आहे. परंतु, हा बॅटरी पॅक आयफोन 12 ला 5 व्हॅट पावरचा आऊटपूट देतो. परंतु, अॅपलच्या फास्ट चार्गिंग सपोर्टसाठी 20W चा पावर अॅडब्टर वापरावा, असा सल्ला कंपनीने दिला आहे. मेगसेफ बॅटरी पॅक हा अॅडब्टर आणि केबलसह येत नाही. एका रिपोर्टमधूम मिळालेल्या माहितीनुसार, मेगसेफ बॅटरीपॅक आयफोन 12 सह एअरपोर्ट सारख्या अॅक्सेसरीज देखील चार्ज करु शकतो.