Apple कडून दीर्घकाळापासून आपल्या iphone SE 2020 च्या लाइनअप स्मार्टफोनवर काम करत आहे. अशातच अॅप्पलकडून iphone SE 3 लवकरच लॉन्च केला जाणार आहे. यंदाच्या वर्षातच हा स्मार्टफोन ग्राहकांना उपलब्ध करुन दिला जाईल अशी अपेक्षा आहे. एका रिपोर्ट्सनुसार, आयफोन एसई 3 पुढील वर्षात मार्च-जून दरम्यान लॉन्च केला जाऊ शकतो. कंपनीने याआधी आयफोन एसई 2020 गेल्या वर्षात लॉन्च केला होता. अपकमिंग आयफोनच्या बद्दल काही स्पेसिफिकेशन आणि किंमत लीक झाली आहे. ज्यामध्ये 5G कनेक्टिव्हिटीचा सपोर्ट मिळणार असल्याचे ही म्हटले गेले आहे.
iphone SE संदर्भात My Drivers च्या रिपोर्टनुसार, आयफोन एसई 3 चे डिझाइन हे iphone XR सारखे असू शकते. ज्यामध्ये एक वाइड नॉच कट आउट असणार आहे. मात्र स्क्रिन ही आकाराने लहान असू शकते. त्याचसोबत जुन्या मॉडेलप्रमाणे होम बटणावर एम्बेड Touch ID सह 4.7 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त iPad मॉडेल सारखा एक साइड-माउंडेट फिंगरप्रिंट सेंसरचा ही दिला जाण्याची शक्यता आहे. परंतु स्मार्टफोन मध्ये फेस आयडी (Face ID) दिला जाणार की नाही याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.(Upcoming Mobiles: मोटोरोला कंपनी मोटो G51 स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत)
अशी अपेक्षा केली जात आहे की, Apple iphone SE 3 ची किंमत CY मध्ये लॉन्च झाल्यास 38,600 रुपये असण्याची शक्यता आहे. भारतात या स्मार्टफोनसाठी मात्र नागरिकांना अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 64GB स्टोरेज मॉडेलसाठी 39,900 रुपयांपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 44,900 रुपयांपर्यंत असू शकते.