Apple iPhone 12 आणि  iPhone 12 Pro ची प्री-ऑर्डर भारतामध्ये Online Store च्या माध्यमातून आजपासून सुरू
Apple iPhone 12 (Photo Credits: Apple)

Apple India Store Online कडून आज (23 ऑक्टोबर)पासून प्री-ऑर्डर घेण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये आता ग्राहक iPhone 12 आणि iPhone 12 Pro चं बुकिंग सुरू करू शकणार आहेत. यावर स्टोअर कडून आकर्षक ऑफर्सदेखील दिल्या जात आहेत. 30 ऑक्टोबरपासून भारतामध्ये नव्या आयफोन 12 ची विक्री सुरू होणार आहे. त्यासाठी आता सुरूवातीला 2020 मध्ये iPhone 12 आणि iPhone 12 Pro हे फोन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. iPhone 12 mini आणि iPhone 12 Pro Max च्या ऑर्डर्स नोव्हेंबर 2020 पासून सुरू केल्या जातील. iPhone 12 Effect: Apple कडून आयफोन ची नवी सीरीज लॉन्च होताच भारतामध्ये iPhone 11, iPhone XR, iPhone SE च्या किंमती घटल्या; इथे पहा नव्या किंमती.

iPhone 12 प्री बूक करणार्‍यांना या फोनचं बेसिक मॉडेल Rs 47,900 ला उपलब्ध असेल तर इएमआय मध्ये Rs 5,637 प्रति महिना असा हा फोन विकत घेता येऊ शकतो. Apple trade-in मध्ये या फोनवर घसघशीत 22 हजारांची सूट ग्राहकांना मिळू शकते. तर iPhone 12 Pro चा बेसिक व्हेरिएंट हा प्रतिमहिना Rs 10,110 च्या इएमआयवर उपलबद्ध आहे. अन्यथा 85,900 रूपयांमध्ये तो खरेदी करता येईल. तसेच अ‍ॅपल ट्रेड इन मध्ये यावर 34 हजार ची सूट आहे.

भारतामध्ये नव्या आयफोन 12 सीरीज मधील फोनच्या किंमती 

iPhone 12 mini 64GB storage: Rs 69,900

iPhone 12 mini 128GB storage: Rs 74,900

iPhone 12 mini 256GB storage: Rs 84,900

iPhone 12 64GB storage: Rs 79,900

iPhone 12 128GB storage: Rs 84,900

iPhone 12 256GB storage: Rs 94,900

iPhone 12 Pro 128GB storage: Rs 1,19,900

iPhone 12 Pro 256GB storage: Rs 1,29,900

iPhone 12 Pro 512GB storage: Rs 1,49,900

iPhone 12 Pro Max 128GB storage: Rs 1,29,900

iPhone 12 Pro Max 256GB storage: Rs 1,39,900

iPhone 12 Pro Max 512GB storage: Rs 1,59,900

अ‍ॅपलकडून काल लॉन्च करण्यात आलेली iPhone 12 आणि iPhone 12 Pro ची सीरीज भारतामध्ये आयफोन प्रेमींना हा नवा फोन 30 ऑक्टोबरपासून खरेदीसाठी उपलब्ध असेल.

भारतामध्ये नवा आयफोन 12 हा सुमारे Rs 69,900 पासून उपलब्ध होईल.