Apple कडून मोफत AirPods खरेदी करण्याची संधी दिली जात आहे. ही ऑफर भारतीय युजर्ससाठी Apple Store वर लाइव्ह करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोफत अॅप्पल एअरपॉड खरेदी करता येणार आहे. दरम्यान, अॅप्पल मोफत एअरपॉड विद्यार्थ्यांना ऑफर करत आहेत. अॅप्पलच्या एज्युकेशन ऑफरमध्ये कॉलेज आणि युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांना Mac किंवा iPas खरेदी करायचा असेल तर त्यांना मोफत एअरपॉड्स मिळणार आहेत. त्याचसोबत शिक्षकांना सुद्धा याचा फायदा घेता येणार आहे.(Colorful Apple Watch International Collection: अॅपल कंपनीचे कलरफूल आंतरराष्ट्रीय कलेक्शन बँड लॉन्च)
अॅप्पलकडून UNiDAYS प्लॅटफॉर्म आपल्या दाव्याचा तपास करणार आहे की, तुम्ही विद्यार्थी आहात की नाही. यासाठी तुम्हाला युनिव्हर्सिटी आयडी किंवा एक्सेप्टेंस ऑफर द्यावे लागणार आहे. तर
MacBook Air, MacBook Pro, iMac, Mac Pro, Mac Mini, iPadPro, iPadAir यावर आयपॉड फ्री मध्ये दिले जाणार आहेत.
अॅप्पल ऑफरमध्ये वायर एअरपॉड फ्री देणार आहे. मात्र तुम्हाला वायरलेस अॅप्पल एअरपॉड्स किंवा एअरपॉड्स प्रो खरेदी करायचे असल्यास तुम्हाला अधिक खर्च करावा लागणार आहे. युजर्सला वायरलेस एअरपॉड्ससाठी 4 हजार रुपये द्यावे लागतील. तर एअरपॉड्स प्रोसाठी 10 हजार रुपये मोजावे लागणार आहेत.(Apple चा स्वस्त iPad लवकरचं भारतात लाँच होणार; जाणून घ्या संभाव्य किंमत आणि स्पेसिफिकेशन्स)
दरम्यान,कंपनीने आयफोन 12 सिरीजसाठी मेगसेफ बॅटरी पॅक लॉन्च केला आहे. याद्वारे आयफोनचे लेटेस्ट स्मार्टफोन्स वायरलेस पद्धतीने चार्ज करणे शक्य होणार आहे. हा मेगसेफ बॅटरी पॅक चुंबकासारखा आयफोन 12 मॉडल्सच्या मागे चिकटतो आणि यात आयफोन 12 च्या सर्व मॉडल्सना चार्ज करण्याची क्षमता आहे. अॅपल मेगसेफ बॅटरी पॅकची भारतातील किंमत 10,990 असून युएसमध्ये याची किंमत 99 डॉलर इतकी आहे. सध्या हा बॅटरीपॅक युएसमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असून भारतातील अॅपल स्टोअरने त्यांच्या वेबसाईटवर डिव्हाईस दाखवली आहे.