Apple (Apple / Twitter)

अ‍ॅपल (Apple) कडून आज (12 सप्टेंबर) iPhone 15 लॉन्च केला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी त्याचा इव्हेंट सुरू होणार आहे. जगभरातील अ‍ॅपल प्रेमी हा इव्हेंट युट्युबवर लाईव्ह पाहू शकणार आहे. दरम्यान आयफोन 15 मध्ये नेमके कोणकोणते फीचर्स असतील याची उत्सुकता अनेकांना आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार आयफोन 15 मध्ये Android सारखा चार्जिंग पोर्ट असू शकतो, बॅटरी कॅमेरा झूम असू शकतो. तज्ञांच्या मते, नव्या फीचर्समुळे ग्राहकांच्या खिशाला चाट पडू शकतो.

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया मध्ये Cupertino येथे iPhone 15 launch चं आयोजन करण्यात आले आहे. आयफोन 15 सोबतच या सोहळ्यामध्ये Watches, AirPods आनि अन्य उपकरणं देखील अपडेट करून लॉन्च होतील. हा इव्हेंट Apple TV तसेच अ‍ॅपल च्या अधिकृत युट्युब चॅनेलवर पाहता येणार आहे. Apple Alert: झोपताना iPhone जवळ ठेवून चार्ज करत असाल तर व्हा सावध; कंपनीने जारी केला इशारा .

अ‍ॅपल इव्हेंट इथे पहा  

iPhone 15 बाबतच्या अपेक्षा

  • iPhone 15 हा त्यांच्या सॅन्डर्ड 6.1-inch screen आणि 128 gigabytes स्टोरेज मध्ये असेल. त्याची किंमत सुमारे

    $899 असू शकते.

  • iPhone 15 Plus हा 6.7-inch screen मध्ये असेल त्याची किंमत $999 असू शकते.
  • Wedbush report नुसार, आयफोन 15 मध्ये फीचर वेगवान असू शकतात. A17 bionic chip, अधिक चांगली बॅटरी लाईफ, type-C charging port मध्ये सुधारणा, कॅमेरा टेक्नॉलॉजी अधिक चांगली केली जाऊ शकते. titanium edges आणि सॉफ्टवेअर अपग्रेड्स असू शकतात.
  • दरम्यान आयफोन 15 मध्ये प्रमुख आकर्षण हे iPhone 15 Pro Max चा periscope telephoto lens असणार आहे. यामुळे optical zoom capability अधिक चांगली होणार आहे. 5x-6x optical zoom मिळू शकेल. जी सध्याच्या Phone 14 Pro च्या दुप्पट असेल.
  • iPhone 15 मध्ये USB-C charging port असण्याचा अंदाजही वर्तवला जात आहे. जो Android smartphone models असेल.