Photo Credit- X

Apple: मुंबई आणि दिल्लीतील ॲपल रिटेल स्टोअर्सना भारतीय ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. हे पाहता ॲपलने बुधवारी सांगितले की, कंपनी भारतात आणखी विशेष आणि ब्रँडेड स्टोअर्स उघडणार आहे. वास्तविक, कंपनीने या वर्षी सप्टेंबरमध्येच iPhone 16 सीरीज लॉन्च केली आहे. नवीन आयफोन खरेदी करण्यासाठी भारतातील या दोन्ही ॲपल स्टोअरमध्ये खरेदीदारांची गर्दी होती. ॲपलने दिलेल्या माहितीनुसार, बेंगळुरू, पुणे, दिल्ली-एनसीआर आणि मुंबईमध्ये नवीन रिटेल स्टोअर्स सुरू होतील. मात्र, आतापर्यंत ही दुकाने सुरू करण्यासाठी कोणतीही अंतिम मुदत देण्यात आलेली नाही.

Apple चे रिटेलचे वरिष्ठ उपाध्यक्ष Deirdre O'Brien म्हणाले, "आम्ही भारतामध्ये अधिक स्टोअर्स उघडण्याच्या योजनांसह आमची टिम तयार करण्यास अत्यंत उत्सुक आहोत. याचे कारण म्हणजे आम्ही भारतातील आमच्या ग्राहकांच्या सर्जनशीलता आणि उत्कटतेने प्रेरित आहोत."

Apple चे रिटेलचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणाले, "ॲपल रिटेल स्टोअर्सनी भारतीय ग्राहकांसोबतचे नाते घट्ट करण्यात विशेष भूमिका बजावली आहे. या स्टोअर्सनी भारतीय ग्राहकांवर ॲपलची अद्भुत जादू निर्माण केली आहे." ते पुढे म्हणाले, “आम्ही यापुढे ग्राहकांना आमची विशेष उत्पादने आणि सेवा खरेदी करण्यासाठी जास्त वेळ प्रतीक्षा करायला लावू शकत नाही. आम्ही त्यांना आमच्या अपवादात्मक, जाणकार टीम सदस्यांशी जोडू इच्छितो."

अधिक माहिती देताना कंपनीने सांगितले की, आयफोन 16 लाइनअप भारतात तयार होत आहे. भारतात बनवलेले iPhone 16 Pro आणि Pro Max लवकरच स्थानिक ग्राहकांसाठी आणि इतर देशांमध्ये निर्यात करण्यासाठी उपलब्ध होतील. सध्या कंपनीचे भारतात दोन रिटेल स्टोअर्स आहेत, जे साकेत, दिल्ली आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे आहेत.