प्रीमियम स्मार्टफोन निर्माता कंपनी अॅप्पल वर पुन्हा एकदा ग्राहकांनी फसवणूकीचा फसवणूकीचा आरोप लावला आहे. कंपनीवर Apple App स्टोअरच्या माध्यमातून ग्राहकांना महागडे अॅपचे सब्सक्रिप्शन ऑफर उपलब्ध करुन दिल्याचा आरोप आहे. या महागड्या अॅप सब्सक्रिप्शनमध्ये ग्राहकांना अधिक फंक्शन्स दिले जात नाही. मात्र तरीही अॅपकडून या अॅपचे अॅपलकडून प्रमोशन केले जात असल्याचे म्हटले आहे. याच प्रकारची घटना या वर्षी फेब्रुवारी महिन्यात समोर आली होती. तेव्हा आयफोन तयार करणारी कंपनी अॅप्पलच्या विरोधात अॅप डेव्हलपर्सने जोरदार विरोध करत अॅप स्टोअरवरील बेकार अॅप ब्लॉक करण्याची मागणी केली होती.
याआधी सुद्धा अॅपवर सॉफ्टवेअर अपडेटच्या माध्यमातून आयफोनच्या जुन्या मॉडेलला स्लो करण्याचा सुद्धा आरोप कंपनीवर लावण्यात आला होता. त्यामुळे आयफोनच्या नव्या मॉडेलची विक्री वाढवता येऊ शकते.(Nude Photos साठी Apple स्कॅन करणार तुमचा फोन; Child Porn ला आळा घालण्यासाठी कंपनीने उचलले मोठे पाऊल)
महागड्या अॅपचे सब्सक्रिप्शनचे प्रकरण आता पुन्हा चर्चेत आले आहे. त्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, अॅप्पल मुद्दाम महागडे अॅप ग्राहकांना ऑफर करत आहे. अॅप डेव्हलपर्स Simeon यांनी ट्विट करत या मुद्दा उपस्थितीत केला असून याला एक घोटाळ्याचे नाव दिले आहे. त्यांनी असे म्हटले की, अॅप्पलच्या अशा पद्धतीचे वागणूकीमुळे लोकांना अॅप डेव्हलपर्सवर विश्वास कायम राहणार नाही. या वर्षाच्या सुरुवातीला डेव्हलपर्स Kosta Eleftheriou ने Apple Watch अॅप स्कॅम हायलाइट केले होते. हे प्रकरण जोर धरु लागल्यानंतर अॅप्पला ते हटवावे लागले होते.