UIDAI च्या नावाने पुन्हा आपोआप सेव्ह होतोय नंबर, तुमच्या फोन मध्येही 1800-300-1947 हा नंबर दिसताच डिलीट करा
UIDAI's helpline number (Photo Credits: Archived and representative images)

UIDAI Fake Helpline Number: आधारचा डेटा सुरक्षित आहे की नाही याबाबत अनेकदा चर्चा रंगली आहे. मागील ऑगस्ट महिन्याप्रमाणेच आता पुन्हा अँड्रॉइड आणि आयफोन युजर्सच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये UIDAI च्या नावाने पुन्हा आपोआप सेव्ह होतोय. हा क्रमांक उघडल्यानंतर 1800-300-1947 टोल-फ्री नंबर असल्याचं दाखवलं जात आहे. अनेक युजर्सनी हा क्रमांक कधीच आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केलेला नाही मात्र तरीसुद्धा हा क्रमांक मोबाईल फोनमध्ये कसा येतो ? हा प्रश्न सतावत आहे.

आधार अथॉरिटीकडून याबाबत कोणतेच स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही मात्र हा प्रकार समोर आल्याने याबाबत तक्रार केली आहे. एक्सपर्टच्या मते, असा क्रमांक दिसताच युजर्सनी तो कॉन्टॅक्ट लिस्टमधून काढून टाकायला हवा.

ऑगस्ट महिन्यात जेव्हा अशाच प्रकारे नंबर कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह होत होता तेव्हा आम्ही कोणत्याच फोन ऑपरेटर्सना असा डाटा दिलेला नाही असं सांगण्यात आले . होते. मात्र असे असूनही देशभरात विविध ठिकाणी युजर्सनी आपोआप1800-300-1947 फोन नंबर सेव्ह होत असल्याची तक्रार केली आहे.