Amazon चे नवे सीईओ Andy Jassy यांची मोठी घोषणा- येत्या काही महिन्यात 55,000 लोकांना देणार नोकऱ्या, जाणून घ्या कोणत्या क्षेत्रात आहे संधी 
प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: BussinessSuiteOnline.com)

कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीमुळे अनेकांचे आर्थिक गणित कोलमडून गेले आहे. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने लोक समस्यांचा सामना करीत आहेत. आता ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉन (Amazon) मोठ्या प्रमाणावर लोकांची भरती करणार आहे. Amazon.com Inc येत्या काही महिन्यांत जागतिक स्तरावर कॉर्पोरेट आणि तंत्रज्ञानाशी संबंधित कामांसाठी 55,000 लोकांना कामावर घेण्याची योजना आखत आहे, असे कंपनीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जस्सी (Andy Jassy) म्हणाले. जुलैमध्ये सीईओ म्हणून पदभार स्वीकारलेल्या जस्सी यांनी पत्रकारांना दिलेल्या पहिल्या मुलाखतीत सांगितले की, कंपनीला रिटेल, क्लाउड आणि जाहिरातींमधील वाढत्या मागणीसह आपल्या इतर व्यवसायांशी जुळवून घेण्यासाठी अधिक लोकांची गरज आहे.

नव्या लोकांना कामावर घेण्याचा हा आकडा 30 जूनपर्यंत गुगलच्या एकूण कामगारांच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त आहे आणि फेसबुकच्या संख्येच्या जवळ आहे. जेसी म्हणाले की, 55 हजारांहून अधिक नोकऱ्यांपैकी 40 हजारांहून अधिक अमेरिकेत असतील, तर उर्वरित भारत, जर्मनी आणि जपानसारख्या देशांमध्ये कंपनीचे जॉब फेअर 'अॅमेझॉन करिअर डे'द्वारे भरती होतील.

कंपनीच्या Project Kuiper साठीही नवीन लोकांची गरज आहे. Amazon ब्रॉडबँडचा वापर सुलभ करण्यासाठी या प्रकल्पाद्वारे उपग्रह कक्षेत सोडणार आहे. अॅमेझॉनचा वार्षिक रोजगार मेळावा 15 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे आणि अपेक्षेप्रमाणे लोकांना भरती करण्याची ही चांगली संधी ठरणार आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, कंपनी म्हणते की नवीन लोकांना नियुक्त केल्याने अॅमेझॉनच्या कॉर्पोरेट आणि तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांची संख्या 20 टक्क्यांनी वाढेल, जी सध्या जागतिक स्तरावर 275,000 च्या आसपास आहे. (हेही वाचा: NPCIL Recruitment 2021: न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 107 जागांसाठी भरती, 'असा' करता येईल अर्ज)

अँडी जस्सी म्हणाले, अमेझॉन ज्या पदांवर लोकांची भरती करणार आहे, त्यात इंजिनीअरिंग, रिसर्च सायन्स आणि रोबोटिक्स यांचा समावेश आहे. अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाची खासगी नियोक्ता अॅमेझॉनने 2020 मध्ये 500,000 हून अधिक लोकांना नोकऱ्या दिल्या होत्या. ही भरती मुख्यत्वे वेअरहाऊसिंग आणि डिलिव्हरी संबंधित कामासाठी होती.