Amazon Summer Carnival Sale ला आजपासून सुरुवात: Summer Appliances वर 50% सूट
Amazon Summer Carnival Sale (Photo Credits: Amazon Official Site)

मार्च महिन्याच्या उत्तरार्धात आपण प्रवेश केला आहे. उन्हाच्या झळाही जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे आता फ्रिज, एअर कंडिशनर, कुलर यांसारखे समर अप्लायन्सेस खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असेल. तुमचाही अशी काही खरेदी करण्याचा विचार असेल तर अॅमेझॉन समर कार्निव्हल सेलचा (Amazon Summer Carnival Sale) तुम्ही नक्कीच विचार करु शकता. या सेल अंतर्गत सर्व समर अप्लायन्सेसवर (Summer Appliances) 50 टक्के सूट दिली जात आहे. त्याचबरोबर काही प्रॉडक्ट्सवर अधिक डिस्काऊंट दिला जात आहे. (Amazon Fab Phones Fest Sale ला 22 मार्चपासून सुरुवात; Xiaomi Mi 10i, OnePlus Nord सह अन्य स्मार्टफोन्सवर मिळवा 40% सूट)

Blue Star Window AC:

या उन्हाळ्यात तुमच्या 100 फूट जागेसाठी 0.75 टनचा विंडो एसी हा अगदी योग्य ठरेल. ब्लू स्टारचा हा 3 स्टार एसी अँटीबँटेरियल कोटिंगसह येतो. यामध्ये कॉपर क्न्डेंसर कॉईल असल्यामुळे चांगली कुलिंग देऊन कमी मेन्टेन्सस लागतो. या एसची साईज 60X38X56 सेमी इतकी आहे. हा एसी तुम्हाला 20,200 रुपयांना अॅमेझॉनवर मिळेल.

Whirlpool Double Door Refrigerator:

Whirlpool चा हा डबल डोअर frost-free फ्रिज 265 लीटर कॅपेसिटीचा आहे. यामध्ये डिप फ्रिज टेक्नॉलॉजी दिली असून फ्रिजरचा थंडावा टिकवून ठेवण्यासाठी चिलिंग जेल सुद्धा दिली आहे. या जेलमुळे वीज नसतानाही फ्रिजमधील वस्तू थंड ठेवण्यास मदत होते. हा फ्रिज तुम्हाला 17 टक्के डिस्काऊंट करुन 23.490 रुपयांना या सेलअंतर्गत उपलब्ध होईल.

Crompton Ozone Air Cooler:

Crompton चा हा ओझोन एअर कुलर 550 स्वे. फूट जागेला छान थंड हवा पुरवू शकतो. या एअर कुलरची कॅपेसिटी 75 लीटर इतकी आहे. यामध्ये हनी कॉम कुलिंग पॅड्स दिले असून स्पीड कंट्रोल करण्यासाठी वेगवेगळे मोड दिले आहेत. या कुलरखाली 4 व्हिल्स दिल्याने तुम्ही याला सहजरित्या फिरवू शकता. हा एअर कुलर अॅमेझॉन सेल अंतर्गत 51 टक्के डिस्काऊंट वर 9749 रुपयांना उपलब्ध असेल.

Atomberg Ceiling Fan:

Atomberg चा हा स्मार्ट सिलिंग फॅन तुम्ही तुमच्या रिमोटने ऑपरेट करु शकाल. या फॅनचा स्पीड आणि टायमर तुम्ही रिमोटच्या माध्यमातून अॅडजस्ट करु शकता. हा फॅन 17 टक्के डिस्काऊंटवर 4550 रुपयांना अॅमेझॉनवर उपलब्ध आहे.

तुम्हाला यापैकी कोणते प्रॉडक्ट खरेदी करायचे असेल तर या सेलाचा तुम्ही अवश्य लाभ घेऊ शकता. आजपासून सुरु झालेला हा सेल 22 मार्च पर्यंत सुरु राहणार आहे.