Amazon | (File Photo)

ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने (Amazon) फॅब फोन्स फेस्ट सेलची Fab Phones Fest Sale) घोषणा केली आहे. अॅमेझॉनवर 22 मार्चपासून या सेलला सुरुवात होईल. 25 मार्च पर्यंत तुम्ही या सेलचा लाभ घेऊ शकाल. या सेल अंतर्गत युजर्संना सॅमसंग (Samsung), अॅपल (Apple), शाओमी (Xiaomi), रियलमी (Realme), विवो (Vivo) आणि इतर ब्रँड्सवर डिस्काऊंट मिळेल. तसंच ग्राहकांना स्मार्टफोन खरेदीवर 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. त्याचबरोबर नो-कॉस्ट ईएमआय (No Cost EMI), एक्सचेंज ऑफर्स आणि बँक ऑफर्स देखील या सेल अंतर्गत देण्यात येतील.

अॅमेझॉनने स्मार्टफोनच्या डिस्काऊंट प्रायजेस अद्याप जारी केलेल्या नाहीत. परंतु, रेडमी 9 ए स्मार्टफोन 7000 रुपयांच्या किंमतीत मिळेल. त्याचबरोबर रेडमी 9 प्राईम स्मार्टफोन 10,000 पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. या सेलअंतर्गत वनप्लस 8 प्रो आणि वनप्लस 8 टी यांसारख्या फ्लॅगशीप फोन्सवर अॅमेझॉनकडून डिस्काऊंट देण्यात येईल. त्याचप्रमाणे अॅपल आयफोन 12 मिनी वर देखील ऑफर सादर केली जाईल. (Flipkart वर 16 मार्चपासून Electronics Sale; स्मार्टफोन, लॅपटॉप, फ्रीजसह अन्य अॅक्सेसरीजवर मिळवा जबरदस्त डिस्काउंट)

सॅमसंग गॅलेक्सी एस 21+ 5G या फोनवर 10,000 रुपयांचा अॅमेझॉन डिस्काऊंट उपलब्ध आहे. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड, क्रेडिट ईएमआय किंवा डेबिट ईएमआयचा वापर केल्यास 7000 रुपयांचा अधिक डिस्काऊंट मिळू शकतो. एक्सचेंज ऑफरमध्ये या मोबाईलवर 12,400 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट मिळू शकतो.

मिड रेंज फोन्सवर देखील ग्राहकांना डिस्काऊंट देण्यात येणार आहे. यामध्ये वनप्लस नॉर्ड, शाओमी एमआय 10 आय आणि सॅमसंग गॅलेक्सी एम51 या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. या सर्व ऑफर्स 19 मार्च रात्री 12 पासून सुरु होतील. तुम्ही देखील मोबाईल खरेदी इच्छित असाल तर ही संधी अजिबात सोडू नका.