Amazon Great Republic Day Sale 2025: नवीन वर्षाच्या सुरुवातीला आता बहुप्रतिक्षित शॉपिंग इव्हेंटपैकी एक असलेल्या ॲमेझॉनच्या रिपब्लिक डे सेल 2025 ची घोषणा झाली आहे. दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिनी यावेळेसही ॲमेझॉन आपला धमाकेदार सेल घेऊन येत आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांचा उत्साह वाढवण्यासाठी सेलची रिलीज डेट जाहीर केली आहे. यासह, काही ट्रेंडिंग उत्पादनांवर उपलब्ध आकर्षक सवलतींबद्दल माहिती शेअर केली आहे. ॲमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल 2025 हा 13 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या सेलमध्ये तुम्ही तुमचे आवडते कपडे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, गृहोपयोगी उपकरणे आणि मोबाईल फोन कमीत कमी किमतीत खरेदी करू शकाल.
या सेलमध्ये कंपनी काही लोकप्रिय स्मार्टफोन्सवर भरघोस सूट देणार आहे. या स्मार्टफोनमध्ये iQOO 13, OnePlus 13, Motorola Razr 50 Ultra, Tecno Phantom V Fold 5G आणि Samsung Galaxy S23 Ultra सारखे मॉडेल असतील. कंपनी सेल अंतर्गत थेट सूट, बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर देखील देईल. ॲमेझॉन या सेलमध्ये प्राइम सदस्यांना 13 जानेवारीच्या मध्यरात्री 12 वाजता लवकर प्रवेश मिळेल आणि त्यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून हा सेल प्रत्येकासाठी सुरु होईल.
इलेक्ट्रॉनिक वस्तू ही प्रत्येकाची गरज बनली आहे. म्हणूनच जर तुम्हाला अनेक दिवसांपासून लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅबलेट किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण घ्यायचे असेल तर आता तुमची प्रतीक्षा संपणार आहे. ॲमेझॉनवर सुरु होणाऱ्या या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठ्या ऑफर्स असणार आहेत. यामध्ये तुम्हाला हेडफोन्स आणि स्मार्टवॉचवर 75% पर्यंत सूट, लॅपटॉपवर 40% पर्यंत सूट आणि टॅब्लेटवर 60% पर्यंत सूट मिळतील.
जर तुम्ही किचन मेकओव्हरची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी किचनशी संबंधित उत्पादने स्वस्त दरात खरेदी करण्याची ही चांगली संधी आहे. या सेलमध्ये 70% पर्यंत मोठ्या बचतीवर स्वयंपाकघरातील आणि घरगुती उपकरणे खरेदी केली जाऊ शकतात. यामध्ये तुम्हाला गॅस स्टोव्ह, भांडी, किचन चिमणी, फ्रीज, मिक्सर ग्राइंडर अशा सर्व वस्तू स्वस्त दरात मिळतील. (हेही वाचा: Quick Commerce Sector: ॲमेझॉन करणार क्विक कॉमर्स सेक्टरमध्ये प्रवेश; 15 वितरीत केली जाणार ऑर्डर, जाणून घ्या सविस्तर)
या सेलमध्ये तुम्ही कपडे, शूज, मेक-अप, सौंदर्य आणि ॲक्सेसरीज स्वस्त दरात खरेदी करू शकाल. हे सर्व टॉप ब्रँडचे असतील, ज्यांची गुणवत्ता आणि किंमत देखील वाजवी असेल. म्हणूनच तुम्हाला काय विकत घ्यायचे आहे, तुम्हाला कोणत्या प्रकारची खरेदी करायची आहे आणि तुमचे बजेट काय आहे, या सर्वांचे आधीच नियोजन करा आणि ते कार्टमध्ये जोडा. कंपनी बँक ऑफर देखील देत आहे. ग्राहकाने एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास, ऑफर अंतर्गत 10% ची त्वरित सूट देखील दिली जाईल.