ई कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉन इंडियावर ग्रेट इंडियन फेस्टिवल सुरु आहे. त्याचा आज शेवटचा दिवस आहे. या सेलअंतर्गत स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काऊंट मिळत आहे. त्यामुळेच नवी फोन घेऊ इच्छित असाल तर ही संधी अजिबात सोडू नका. तर या सेलअंतर्गत मिळणाऱ्या डिस्काऊंट एक नजर टाकूया....
Samsung Galaxy Note 8
या फोनची किंमत 74,690 रुपये आहे. पण या सेलअंतर्गत या फोनवर 30,700 रुपयांचा फ्लॅट डिस्काऊंट मिळत आहे. त्याचबरोबर SBI कार्ड पेमेंट केल्यावर ग्राहकांना 2,000 रुपयांचे डिस्काऊंट मिळेल. तसंच 3,000 रुपयांची एक्सचेंज ऑफरही मिळत आहे. नो कॉस्ट ईएमआयसोबत ग्राहकांना 18,900 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.
Samsung Galaxy A8+
या फोनवर 17,910 रुपयांचा फ्लॅट डिस्काऊंट मिळत आहे. त्यामुळे 23,990 रुपयांना हा फोन उपलब्ध होईल. त्याचबरोबर फ्री स्क्रीन रिप्लेसमेंटची सुविधा मिळत आहे. याशिवाय SBI कार्ड वरुन पेमेंट केल्यास 2,000 रुपयांचे डिस्काऊंट मिळेल.
Huawei P20 Lite
हा फोन 22,999 रुपयांऐवजी 15,999 रुपयांना खरेदी केला जाईल. यावर 7,000 रुपयांचे डिस्काऊंट मिळत आहे. याशिवाय SBI च्या डेबिट कार्डने पेमेंट केल्यास 10% डिस्काऊंट मिळत आहे. त्याचबरोबर नो कॉस्ट ईएमआय हा पर्याय देखील उपलब्ध आहे.
Huawei Nova 3i
या फोनवर 6,009 रुपयांचा डिस्काऊंट मिळत असून तुम्ही हा फोन 17,990 रुपयांना खरेदी करु शकाल. याची मूळ किंमत 23,999 रुपये आहे. या फोनवर 15,900 रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळत आहे. त्याचबरोबर HDFC बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर नो कॉस्ट EMI चा पर्याय दिला जात आहे. त्याचबरोबर 7,000 रुपये किंमतीची फ्री रिप्लेसमेंट सुविधाही दिली जात आहे.
टीव्ही आणि फ्रिजवरही मिळत आहे डिस्काऊंट
LG 108 cm
या टीव्हीवर 30% डिस्काऊंट दिला जात आहे. या डिस्काऊंट अंतर्गत हा टीव्ही 50,490 रुपयांना खरेदी केला जाईल. याची मूळ किंमत 71,990 रुपये आहे. पेमेंट करताना LAPP16 प्रोमोकोडचा वापर केल्यास ग्राहकांना 8,078 रुपयांचा डिस्काऊंट मिळेल. याशिवाय ICICI बँकेच्या कार्डवरुन पेमेंट केल्यास 10%चा डिस्काऊंट दिला जात आहे.
LG Direct Cool 190 रेफ्रीजरेटर
या रेफ्रीजरेटरची किंमत 17,690 रुपये आहे. यावर 20% डिस्काऊंट मिळत असल्याने ग्राहकांना फ्रिज 14,185 रुपयांना खरेदी करता येईल. पेमेंट करताना LAPP16 प्रोमोकोड वापरल्यास ग्राहकांना 2,270 रुपयांचे डिस्काऊंट मिळेल. याशिवाय ICICI बँकेच्या कार्डवरुन केल्यास 10%चा डिस्काऊंट मिळेल.