Samsung Galaxy M13 5G (PC - @Gadgets360/twitter)

Amazon Diwali Sale: Samsung Galaxy M13 5G या वर्षी जुलैमध्ये लॉन्च झाला होता. कंपनीने या फोनचे 4G आणि 5G असे दोन्ही मॉडेल एकाच वेळी लॉन्च केले आहेत. लॉन्चच्या वेळी कंपनीने फोनच्या 4 जीबी रॅम, 64 जीबी इंटरनल स्टोरेजची किंमत 13,999 रुपये आणि 6 जीबी रॅम, 128 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 15,999 रुपये ठेवली आहे. पण दिवाळी सेलमध्ये या फोनची किंमत खूपच कमी झाली आहे.

Amazon च्या दिवाळी सेलमध्ये, Samsung Galaxy M13 5G च्या 4 GB रॅम, 64 GB इंटरनल स्टोरेजची किंमत 11,999 रुपयांपर्यंत खाली आली आहे. या Amazon सेलमध्ये, तुम्ही ICICI, Axis किंवा Citi Bank कार्डद्वारे या फोनवर 1000 रुपयांची अतिरिक्त झटपट सूट मिळवू शकता. जर तुम्ही EMI पर्याय निवडला तर तुम्ही या फोनवर 1250 रुपयांची झटपट सूट घेऊ शकता. याशिवाय फोनवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. ज्यामुळे तुम्हाला हा फोन अगदी कमी किंमतीत मिळू शकेल. (हेही वाचा - Airtel 5G Plus 'या' आठ शहरांमध्ये झाले लॉन्च; तुम्ही याचा फायदा कसा घेऊ शकता? जाणून घ्या)

Samsung Galaxy M13 5G ची वैशिष्ट्ये

• Galaxy M13 5G मध्ये 6.5 इंच आकारमानाचा डिस्प्ले आहे. फोनमध्ये 90 HZ चा रिफ्रेश दर देण्यात आला आहे.

• प्रोसेसर- MediaTek Dimensity 700 प्रोसेसर या फोनमध्ये उपलब्ध आहे.

बॅटरी - कंपनीने फोनमध्ये 5,000 mAh ची बॅटरी दिली आहे.

• रॅम आणि मेमरी - हा फोन 4 GB रॅम, 64 GB अंतर्गत स्टोरेजसह बाजारात उपलब्ध आहे. याशिवाय रॅम प्लस फीचरसह 12 जीबीपर्यंत रॅम वापरता येईल.

• OS- या फोनमध्ये Android 12 उपलब्ध आहे.

याशिवाय या सॅमसंग फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, ज्यामध्ये 50 MP मेन बॅक कॅमेरा आणि 2 MP दुसरा कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा बसवण्यात आला आहे.