Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

नवीन वर्ष सुरू 15 दिवस उलटले नाही तर एक मोठं डाटा लीक प्रकरण समोर आलं आहे. प्रसिद्ध

सिक्युरिटी रिसर्चर Troy Hunt यांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 773 million773 दशलक्ष इमेल आयडी आणि पासवर्ड्स झालेत leaked,या यादीमध्ये तुमचं तर नाव नाही ना? इथे करा आत्ताच तपासून पहा  युनिक इमेल आयडीज आणि 21 million युनिक पासवर्ड्स लीक झाले आहेत. या वृत्तामुळे आज जगभरात अनेक युजर्स चिंतेत आहेत. ही माहिती देताना Huntने हे Collection #1असल्याचं म्हटलं आहे.

इमेल आणि पासवर्ड्स लीक होणं ही टेक्नॉलॉजी क्षेत्रातील एक मोठी गोष्टी आहे. अशाप्रकारे डाटा लीक होणं म्हणजे युजर्सची सारी वैयक्तिक माहिती हरवणं आहे. यमध्ये तुमचे महत्त्वाचे इमेल्स, फोटोज, व्हिडिओज, क्लाऊड सिस्टीमवरील माहिती याचा समावेश होऊ शकतो. आता या डाटा लीकमध्ये तुमचा ईमेल आयडी तर नाही ना? हे नक्की तपासून पहा.

Have I been Pwned यावर तुम्ही तुमचा ईमेल आयडी टाकून तो तपसून पाहू शकता. या साईटवर सर्च केलेल्या, डाटा लीकमधील ईमेल आयडीची माहिती देत आहे. त्यामुळे तुमचा ईमेल आयडी सुरक्षित आहे की नाही ? ते यावर तपासू शकता. याचप्रमाणे तुमचा पासवर्ड डाटा लीक मध्ये आहे की नाही ? हे देखील तपासून पाहू शकता.

इमेल आय डी तपासण्यासाठी येथे क्लिक करा

पासवर्ड तपासण्यासाठी येथे क्लिक करा

 

तुमचा इमेल आय डी अफेक्ट झाला असेल तर ताबडतोब त्याचा पासवर्ड बदलणं हितकारी आहे.