BSNL Recharge Plan: बीएसएनएलच्या 'या' रिचार्जवर मिळेल 60 दिवसांसाठी 100GB डेटा, मोफत कॉलिंगची सुविधा; जाणून घ्या सविस्तर
BSNL (Photo Credit: Livemint)

BSNL आपल्या ग्राहकांना अनेक प्रीपेड रिचार्ज योजना ऑफर करते. जर तुम्ही 60 दिवसांची वैधता असलेला प्लान शोधत असाल, तर बीएसएनएलच्या पोर्टफोलिओमध्ये अशा अनेक योजना उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये 60 दिवसांपर्यंतच्या वैधतेसह अनेक सेवा उपलब्ध आहेत. कंपनी 447 रुपयांची योजना ऑफर करते, ज्यामध्ये वापरकर्त्यांना Eros Now चे सबस्क्रिप्शन मिळते. यासोबतच या प्लानमध्ये BSNL Tunes ची सुविधा देखील उपलब्ध आहे. रिचार्ज प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना 100GB डेटासह दररोज 100 SMS मिळतात.

तसेच, BSNL प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे. FUP मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, वापरकर्त्यांना 80Kbps च्या वेगाने डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 100GB डेटा मिळत असल्याने, तुम्हाला दररोज डेटाची काळजी करण्याची गरज नाही. म्हणजेच, या प्लानमध्ये यूजर्सला कोणत्याही डेली लिमिटशिवाय डेटा मिळतो. (वाचा - BSNL च्या 'या' प्लॅन्समुळे Jio, Airtel आणि Vodafone-Idea चे टेन्शन वाढले, दररोज 5GB पर्यंत डेटासह मिळणार अनेक फायदे)

हा सर्वात स्वस्त पर्याय -

जर तुम्ही परवडणारा प्लान शोधत असाल, तर BSNL चा 247 रुपयांचा प्लान हा एक चांगला पर्याय आहे. तथापि, या प्लॅनमध्ये 447 रुपयांच्या तुलनेत केवळ अर्धे फायदे उपलब्ध आहेत. 247 रुपयांमध्ये, BSNL ग्राहकांना एकूण 50GB डेटा मिळतो, जो 30 दिवसांच्या वैधतेसाठी असेल.

या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. प्रीपेड रिचार्जमध्ये, वापरकर्त्यांना Eros Now आणि BSNL Tune चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. सध्या, 60 दिवस आणि 30 दिवसांची वैधता असलेले हे दोन प्लॅन कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये उत्तम पर्याय आहेत.

यामध्ये युजर्सना केवळ डेटाच मिळत नाही तर फ्री व्हॉईस कॉलिंग, Eros Now सबस्क्रिप्शन आणि बीएसएनएल ट्यूनचाही फायदा मिळतो. तुम्हाला कोणत्याही दैनिक मर्यादेशिवाय प्रीपेड रिचार्ज प्लॅन हवा असल्यास, BSNL वापरकर्त्यांसाठी हे सर्वोत्तम पर्याय आहेत.