Neeraj Chopra (Image Credit Jio Cinema Twitter)

भारताचा गोल्डनबॉय भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी केली. वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (World Athletics Championship 2023) नीरजने भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली आहे.या विजयासह वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा निरज हा पहिलाच भारतीय ठरला आहे. नीरज चोप्राने 88.17 मीटर अंतरावर भाला फेकत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तर, पाकिस्तानी खेळाडू नदीम अर्शद दुसऱ्या क्रमांकावर राहिला आणि त्याला रौप्यपदक जिंकण्यात समाधान मानावे लागले. हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात सुरू असलेल्या वर्ल्ड ॲथेलेटिक्स चॅम्पियनशिपच्या शेवटच्या दिवशी नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले आहे.  (हेही वाचा - IND vs PAK Asia Cup Head to Head: आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान 13 वेळा आले आमनेसामने, जाणून घ्या कोणाचे पारडे आहे जड)

पाहा व्हिडिओ -

नीरज चोप्रा दुसऱ्या फेरीनंतर 88.17 मीटरसह अव्वल ठरला. त्याचवेळी जर्मनीचा ज्युलियन वेबर दुसऱ्या फेरीत 85.79 मीटर फेक करून दुसरा आला. या फेरीनंतर झेक प्रजासत्ताकचा जेकोब वडलेच 84.18 मीटर गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. दुसऱ्या स्थानी पाकिस्तानचा अरशन नदीम राहिला. त्याने तिसऱ्या प्रयत्नात बेस्ट थ्रो केला. भालाफेकीत नीरज चोप्राशिवाय भारताचे डीपी मनु आणि किशोर जेना हेसुद्धा फायनलमध्ये होते. मात्र किशोर पाचव्या तर मनु सहाव्या क्रमांकावर राहिले.

भारतासाठी वर्ल्ड एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ट्रॅक अँड फिल्ड कॅटेगरीत मिळालेलं हे पहिलं सुवर्णपदक आहे. त्याच्याआधी अंजू बॉबी जॉर्ज हिने 2003 मध्ये लांब उडी प्रकारात कांस्य पदक जिंकलं होतं. तर नीरज चोप्राने 2022 मध्ये रौप्य पदक पटकावलं होतं.