श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू चमिका करुणारत्नेला (Chamika Karunaratne) बुधवारी झालेल्या लंका प्रीमियर लीग (Lanka Premier League) सामन्यात गंभीर दुखापत झाली. झेल पकडण्याच्या प्रयत्नात करुणारत्नेच्या चेहऱ्यावर दुखापत झाली आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र करुणारत्ने यांची प्रकृती ठीक असून त्यांना कोणताही धोका नाही. करुणारत्ने कॅंडी फाल्कन्सकडून (Candy Falcons) खेळत असून लीगच्या चौथ्या सामन्यादरम्यान त्याला दुखापत झाली. कार्लोस ब्रॅथवेटचा (Carlos Brathwaite) झेल घेण्याच्या प्रयत्नात करुणारत्ने जखमी झाला. चेंडूचा अचूक अंदाज न आल्याने करुणारत्नेच्या चेहऱ्यावर चेंडू पडला आणि त्याचे चार दात तुटले.
करुणारत्नेने झेल पकडला होता, पण लगेचच त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागले. त्यांना तात्काळ रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले. करुणारत्नेची प्रकृती ठीक असून तो धोक्याबाहेर असल्याचे संघ संचालकांनी आपले निवेदन जारी केले आहे. 26 वर्षीय करुणारत्नेने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने श्रीलंकेसाठी आतापर्यंत एक कसोटी, 18 एकदिवसीय आणि 38 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
Chamika hospitalized while attempting catch for Kandy Falcons#LPL2022 #LPL #ChamikaKarunaratne #Cricket pic.twitter.com/yrkT2bbhoG
— Ada Derana Sports (@AdaDeranaSports) December 7, 2022
कसोटीत 22 धावा करण्यासोबतच त्याने एक विकेटही घेतली आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 376 धावा केल्या आहेत आणि 16 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने वनडेत अर्धशतक झळकावले आहे. T20 मध्ये करुणारत्नेच्या बॅटमधून 257 धावा निघाल्या आहेत, ज्यामध्ये 31 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. गोलंदाजीत त्याने 21 विकेट्स घेतल्या आहेत. 22 धावांत दोन बळी घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.