![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2024/04/MicrosoftTeams-image-41-380x214.jpg)
आयपीएलमध्ये काल झालेल्या सामन्यातील थर्ड अंपायरने दिलेल्या विराट कोहलीच्या विरोधातील निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला होता यावेळी कोहलीने पंचासोबत वाद देखील घातला यामुळे त्याच्यावर कारवाई झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पहिल्यांदा बॅटिंग करताना 6 विकेटवर 222 धावा केल्या होत्या. आरसीबीकडून या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस या दोघांकडून डावाची सुरुवात करण्यात आली होती. विराट कोहलीनं आक्रमक सुरुवात केली होती. विराट कोहलीनं 2 सिक्स आणि 1 चौकार मारुन 7 बॉलमध्ये 18 धावा केल्या होत्या. हर्षित राणानं टाकलेल्या फुलटॉसवर विराट कोहली बाद झाला. (हेही वाचा - Angry Virat Kohli Argues With Umpire: हर्षित राणाने बाद केल्यानंतर संतप्त विराट कोहलीने अंपायरशी घातला वाद, व्हिडिओ झाला व्हायरल)
फुलटॉसवर विराट कोहली बाद झाला. विराट कोहलीनं डीआरएस मागितला, थर्ड अंम्पायरनं देखील विराट कोहलीच्या विरोधात निर्णय दिला. यावेळी विराट कोहलीने मैदानावरील पंचासोबत वाद घातला होता. यामुळे पंचासोबत वाद घालण्यावरुन बीसीसीआयने विराट कोहलीवर दंडात्मक कारवाई केली आहे. विराट कोहलीला आयपीएलच्या शिस्तीसंदर्भात नियमांचं उल्लंघन केल्यानं मॅच फीसच्या 50 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.
आरसीबीच्या डावाच्या तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर विराट कोहलीला कॅच आऊट देण्यात आलं होतं. विराट कोहलीनं हर्षित राणानं टाकलेला बॉल हा फुलटॉस असल्यानं पंचांच्या निर्णयाविरुद्ध अपील केलं आणि दाद मागितली. तिसऱ्या अंम्पायरनं देखील मैदानावरील पंचांचा निर्णय कायम ठेवला. यानंतर विराट कोहलीने पंचासोबत मैदानात वाद घातला. विराट कोहलीला मॅच फीच्या 50 टक्के रक्कम आयपीएलच्या दंडापोटी भरावी लागणार आहे.