IND vs ENG Test: भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत शानदार शतक ठोकत रवींद्र जाडेजाने रचला इतिहास
रवींद्र जडेजा (Photo Credit: PTI)

एजबॅस्टन, बर्मिंगहॅम (Edgbaston, Birmingham) येथे खेळल्या जात असलेल्या भारत आणि इंग्लंड (IND vs ENG Test) यांच्यातील पाचव्या पुनर्निर्धारित कसोटीत रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) इतिहास रचला. जाडेजाने 194 चेंडूंत 13 चौकारांच्या मदतीने 104 धावांची शानदार खेळी खेळली. यासह, तो कपिल देव (Kapil Dev) आणि एमएस धोनीच्या विशेष यादीत सामील झाला. एका कॅलेंडर वर्षात सातव्या क्रमांकावर किंवा त्यापेक्षा कमी क्रमांकावर फलंदाजी करताना जडेजाने दोन शतके झळकावली आहेत. यासोबतच तो महान क्रिकेटपटू कपिल देव आणि एमएस धोनी यांच्या स्पेशल क्लबमध्येही सामील झाला आहे.

एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे शतक झळकावणारा रवींद्र जडेजा चौथा भारतीय ठरला आहे. त्याच्या आधी याच सामन्यात ऋषभ पंत, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनी एजबॅस्टन येथे कसोटी शतके झळकावली आहेत. जडेजाने 183 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने 13 चौकार मारले. पहिल्या दिवशी ऋषभ पंतने 89 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हेही वाचा Women's FIH Hockey World Cup 2022: सलामीच्या लढतीत इंग्लंडविरुद्ध बदला घेण्यावर भारतीय महिला हॉकी संघाची नजर

जडेजाने 194 चेंडूत 104 धावांची खेळी खेळली. रवींद्र जडेजाचे हे कसोटी क्रिकेटमधील तिसरे शतक आहे. कसोटी क्रिकेटमधील नंबर वन अष्टपैलू खेळाडूच्या नावावर आता 36.76 च्या सरासरीने 2500 धावा झाल्या आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला त्याने 175 धावांची शानदार खेळी केली होती.