IPL 2021: 'या' गोष्टीमुळे बसला राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला दंड, संघातील बाकी खेळाडूंनाही बसला फटका
संजू सॅमसन (Photo Credit: IANS)

आयपीएल 2021 च्या (IPL 2021) 36 व्या सामन्यात (Match) राजस्थान रॉयल्सचा (RR) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (DD) 33 धावांनी पराभव झाला. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीने 20 षटकांत 6 बाद 154 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान संघ 6 विकेटवर 121 धावाच करू शकला. पण या सामन्यानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन (Captain Sanju Samson) साठी एक वाईट बातमी आली आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आणि त्याच्या सहकाऱ्यांना इंडियन प्रीमियर लीगच्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. ज्याला ते येथे 33 धावांनी पराभूत झाले. सॅमसनला 24 लाख रुपये तर प्लेइंग 11 मधील प्रत्येक सदस्याला 6 लाख रुपये किंवा त्याच्या वैयक्तिक मॅच फीच्या 25 टक्के दंड आकारला जाईल.

आयपीएलने एका निवेदनात म्हटले आहे की, आयपीएल आचारसंहिते अंतर्गत हंगामातील संघाचा हा दुसरा भंग होता. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनला पंजाब किंग्जविरुद्धच्या पहिल्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी दंडही ठोठावण्यात आला. सामना अधिकाऱ्यांनी कर्णधार सॅमसनला 12 लाखांचा दंड ठोठावला. संजू या मोसमात आपल्या संघाकडून पुन्हा ही चूक न करण्याचा प्रयत्न करेल अन्यथा शिक्षा वाढू शकते आणि त्याला एक सामन्याची बंदीही लागू शकते. हेही वाचा IPL 2021 Purple Cap Updated: हर्षल पटेलची पर्पल कॅपवरील पकड मजबूत, तर मोहम्मद शमीची मोठी झेप

गोलंदाजांच्या बळावर शेख जायद स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल 2021 च्या 36 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा 33 धावांनी पराभव केला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 6 बाद 154 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ कर्णधार संजू सॅमसनच्या 53 चेंडूत आठ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 70 धावा करूनही 20 षटकांत 121 धावाच करू शकला. दिल्लीकडून एनरिक नोरखियाने दोन तर अवेश खान, रविचंद्रन अश्विन, कागिसो रबाडा आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.