Vedant Madhavan

अभिनेते आर माधवनचा (R Madhavan) मुलगा वेदांत माधवन (Vedaant Madhavan) याने खेलो इंडिया युथ गेम्स (Khelo India Youth Games) 2023 मध्ये सात पदके (Medal) जिंकून आपल्या वडिलांचे नाव उंचावले आहे. आपल्या मुलाच्या या महान कामगिरीचा आर माधव यांना अभिमान आहे. त्याने अनेक ट्विटद्वारे आपला आनंद व्यक्त केला आहे. वेदांतने मध्य प्रदेशात सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये पाच सुवर्ण आणि दोन रौप्य पदके जिंकली आहेत. माधवनने आपल्या मुलाचे आणि त्याच्या टीमचे अनेक फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.

ट्रॉफी आणि पदकासह आपल्या मुलाचा फोटो शेअर करत माधवनने ट्विटमध्ये लिहिले की, देवाच्या कृपेने 100 मीटरमध्ये सुवर्ण, 200 मीटर आणि 1500 मीटरमध्ये सुवर्ण आणि 400 मीटर आणि 800 मीटरमध्ये रौप्यपदक जिंकले. माधवनने आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, अपेक्षा फर्नांडिस (6 सुवर्ण आणि 1 रौप्य) आणि वेदांत माधवन (5 सुवर्ण आणि 2 रौप्य) यांच्या कामगिरीने खूप कृतज्ञ आणि नम्र वाटत आहे.

खेलो इंडियाच्या आयोजनाबद्दल माधवनने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचेही आभार मानले आहेत.  माधवनने आणखी एका ट्विटमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघाचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आणि 56 सुवर्ण, 55 रौप्य आणि 50 कांस्य पदकांसह 161 पदके जिंकली.

माधवनने लिहिले, दोन ट्रॉफी जिंकल्याबद्दल टीम महाराष्ट्रचे अभिनंदन.. एक ट्रॉफी पोहण्याच्या मुलांच्या संघाने जिंकली आणि दुसरी एकूण चॅम्पियनशिप ट्रॉफी महाराष्ट्राने जिंकली. माधवनचा मुलगा वेदांत हा राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू आहे. याआधीही त्याने अनेकवेळा विविध क्रीडा स्पर्धांमध्ये आपले नाव कोरले आहे. माधवन नेहमी आपल्या मुलाचा आधार वाटतो. माधवन नेहमीच आपल्या मुलाच्या विजयावर ट्विट करून आनंद व्यक्त करत आहे. 2021 मध्ये, माधवन ऑलिम्पिकच्या प्रशिक्षणासाठी पत्नीसह दुबईला शिफ्ट झाला, जेणेकरून वेदांतचे प्रशिक्षण योग्य प्रकारे होऊ शकेल.