सर्फिंग चॅम्पियन Poeti Norac हिचे वयाच्या 24 व्या वर्षी ऑस्ट्रेलिया येथे निधन
Surfing Champion Poeti Norac | (Photo Credits: Instagram)

जगप्रसिद्ध सर्फिंग चॅम्पियन पोएटी नौरेंगा (Surfing Champion Poeti Norac) हिचे ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड (Queensland) येथे निधन झाले आहे. ती केवळ 24 वर्षांची होती. फ्रान्स सर्फिंग फेडरेशनने पोएटी नौरेगा (Poeti Norac) हिच्या मृत्यूची पुष्टी करुन माहिती दिली आहे. फ्रान्स सर्फिंग फेडरेशनने म्हटले आहे की, नोरेक हीचा मृत्यू गेल्या आठवड्यातच झाला होता. मात्र, त्याची पुष्टी झाली नव्हती. दरम्यान, तिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ठ होऊ शकले नाही.  ती अलिकडेच ऑस्ट्रेलियात स्थाईक  झाली होती. तिच्या मृत्यूचे गुढ अद्याप कायम आहे.

पोएटी नोरैका ही 2018 मध्ये फ्रेंच सर्फिंग स्पर्धेमध्ये उपविजेती ठरली होती. तर, 2016 मध्ये पार पडलेल्या फ्रेंच सर्फिंग स्पर्धेमध्ये ती तिसऱ्या क्रमांकावर होती. फ्रान्स सर्फिंग फेडरेशनने पोएटी नोरैका हिच्या निधनाबद्दल म्हटले आहे की, नोरैका हिच्या निधनामुळे फ्रेंच सर्फिंग परिवारातील एक सदस्य आम्ही गामावला आहे.

पोएटी नोरैका इन्स्टाग्राम फोटो

 

View this post on Instagram

 

If you’re still looking for this person who’d change your life, look in the mirror. . . 🐒 || 📸: @sandou_rls

A post shared by Poeti Norac 🐚 (@poetinorac) on

फ्रान्स सर्फिंग फेडरेशनने पुढे म्हटले आहे की,  ती एक हसतमूख आणि उमदे व्यक्तीमत्व होते. ती एक कलाकार आणि चांगली क्रीडापटू होती. ती ज्या ठिकाणी जात असे तिथले वातावरण आपल्या उत्साहाने भारुन टाकत असे.

पोएटी नोरैका इन्स्टाग्राम फोटो

 

View this post on Instagram

 

R. number 1: Stay true yo yourself ⚡️ || 📸: @ceciliaphotographie for @oxbow_elle

A post shared by Poeti Norac 🐚 (@poetinorac) on

लवकरच आम्ही पोएटी नौरेंका हिच्यासाठी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करणार आहोत. या कार्यक्रमाची तारीख, ठिकाण आणि वेळ लवकरच कळविण्यात येईल, अशी माहितीही फ्रेच सर्फिंग फेडरेशनने दिली आहे. पोएटी ही चार वेळा राष्ट्रीय स्पर्धेत अंतिम सामन्यांपर्यंत पोहोचली होती. 2017 मध्ये तीने 100 मुलींसोबत 10 फ्रेंच कंप जिंकला होता. (हेही वाचा, Video: बॉक्सिंग रिंगमध्ये ठोसा वर्मी; अपराजीत बॉक्सर Maksim Dadashev चा मृत्यू)

पोएटी नोरैका इन्स्टाग्राम फोटो

 

View this post on Instagram

 

Never too late to set new goals, never too late to have new dreams ✨ || 📸: @sandou_rls

A post shared by Poeti Norac 🐚 (@poetinorac) on

पोएटी नोरैका इन्स्टाग्राम फोटो

 

View this post on Instagram

 

Coquillages et crustacés 🦐 || 📸: @sandou_rls

A post shared by Poeti Norac 🐚 (@poetinorac) on

दरम्यान, नोरेक पोएटी हिचा सर्वात मोठी स्पॉन्सर असलेली कंपनी OXBOW Elle ने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, पोएटी हिच्या निधनाचे वृत्त ऐकून आम्हाला धक्का बसला. आम्हाला प्रचंड दु:ख होत आहे की, आम्ही एक आमचा तरुण तरुण आणि उमदा अॅम्बॅसडर गमावला आहे. ती चार वर्षांपेक्षाही अधिक काळापासून आमच्या OXBOW Elle परिवाराची सदस्य राहिली आहे. नुकतीच ती ऑस्ट्रेलियात स्थलांतरीत झाली होती. दरम्यान, पोएटी हिच्या वडीलांनी एक आठवड्यापूर्वी ती सनशाईन कोस्ट येथून बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना दिली होती. तेव्हापासूनच प्रसारमाध्यमांनी सातत्याने तिच्या बेपत्ता असण्याचे वृत्त दिले होते.