PV Sindhu च्या 'I RETIRE' ट्विटने यूजर्समध्ये संभ्रम, निवृत्तीच्या चर्चांना उधाण, पाहा Post
पीव्ही सिंधू (Photo Credits: Getty Images)

भारताच्या ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पीव्ही सिंधूने PV Sindhu) नुकतंच सोशल मीडिया अकाउंट, ट्विटरवर पोस्ट शेअर करत चाहत्यानां मोठा धक्का दिला. सिंधूने सोमवारी दुपारी 'I Retire' लिहून पोस्ट शेअर केली आणि डेन्मार्क ओपन (Denmark Open) ही अंतिम स्पर्धा होती याबद्दल सिंधूने एका लांब पोस्टमध्ये लिहिले असून निवृत्ती घेण्याचे ठरवले असल्याचं जाहीर केलं. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. मात्र, सिंधूची पोस्ट नीट वाचता तिने बॅडमिंटनमधून निवृत्ती न घेतल्याचे कळते. सिंधूने पोस्टमध्ये लिहिले की, "मी माझ्या भावनांबद्दल समोर येऊन बोलायचं विचार करीत आहे. मला याला सामोरे जाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे मी काबुल करते. हे इतके चुकीचे वाटते. म्हणूनच मी, 'आता बस झाले हे सांगण्यासाठी आज लिहित आहे. तुम्हाला धक्का बसला असेल किंवा गोंधळ झाला असेल तर हे समजण्यासारखे नाही परंतु जेव्हा आपण हे वाचून संपले तेव्हा माझ्या दृष्टीकोनाबद्दल आपणास समजेल आणि आशा आहे की त्यास देखील समर्थन द्याल." सिंधूच्या अशा पोस्टमुळे ती निवृत्त होत असल्याच्या चर्चांना उधाण आले.

सिंधूने असे धक्कादायक ट्विट केले त्यानंतर 25 वर्षीय शटलरने निवृत्ती घेण्याचे ठरवले असल्याचे वृत्त समोर येऊ लागले. तथापि, 25-वर्षीय सिंधूने स्पष्ट केले की सध्याच्या परिस्थितीबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी तिने हे अभूतपूर्व योजना केली. ‘या साथीच्या रोगाने माझे डोळे उघडले, मी सर्वात कठीण प्रतिस्पर्ध्याशी लढण्यासाठी कठोर प्रशिक्षण घेऊ शकले. मी हे आधीही केले आहे, मी हे पुन्हा करू शकते. पण संपूर्ण जगाचे निराकरण करणाऱ्या या अदृश्य विषाणूचा मी कसा पराभव करू,’ असे तिने पुढे म्हटले.

दरम्यान, सिंधूची पोस्ट पाहून पहिले अनेक उजसेर्स यूजर्सचा देखील गोंधळ उडाला होता आणि त्यांनाही बॅडमिंटनपटू निवृत्त झाल्याचे वाटले. पाहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया:

यामुळे मला "मिनी हार्ट अटॅक" आला

चांगला संदेश

तू निवृत्ती झाली असे वाटेल... 

जीवात जीव आला!

‘आज मी सध्याच्या अशांततेतून निवृत्त होण्याचे ठरवले आहे. मी या नकारात्मकतेतून निवृत्त होते,’’ असं ती पुढे म्हणाली. ज्यामुळे अनेकांना ती खेळातून निवृत्त होत नसल्याचा विश्वास बसला. तथापि, सिंधूने पुढे खुलासा केला की तिने जगातील सद्य परिस्थितीची दखल घ्यावी म्हणून तिने हे पाऊल उचलले. सिंधू पुढे म्हणाली की ती खेळातून निवृत्त होत नाही आणि डेन्मार्क ओपन २०२० मध्ये खेळू शकली नसली तरी ती एशिया ओपनमध्ये परतणार आणि ठोस झुंज न देता हार मानण्यास नकार दिला. 25 वर्षीय सिंधू म्हणाली की ती मेहनत घेणे सुरूच ठेवेल. कोरोना व्हायरस महामारी दरम्यान आरोग्य आणि सुरक्षिततेच्या चिंतेमुळे सिंधूने काही महिन्यांपूर्वी डेन्मार्क ओपनमधून माघार घेतली होती. कोविड-19 दरम्यान बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने खेळाडूंना स्वत:च्या जबाबदारीवरुन प्रवास करणार असल्याचे पत्र पाठवल्यानंतर 25 वर्षीय सिंधुने या स्पर्धेतून माघार घेतली.